एक्स्प्लोर
मजुराच्या जनधन खात्यात अचानक चार कोटी जमा
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर पैशांसंदर्भात नवनवीन प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील एटा शहरातील एका कामगाराच्या जनधन खात्यात अचानक चार कोटी जमा झाल्याची माहिती आहे. पोलिस आणि आयकर विभागाने या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे.
अरविंद कुमार यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांचा दिल्लीमध्ये ताडपत्री शिवण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या जनधन खात्यात अचानक 3 कोटी 72 लाख 960 रुपये जमा झाले. त्यामुळे अरविंद कुमार यांनाही धक्का बसला.
अरविंद कुमार काम मिळत नसल्याने एटा या मुळगावी गेले होते. त्यांच्याकडे सध्या आयसीआयसीआय बँकेचं एटीएम आहे. मात्र घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्त्यावर नवीन एटीएम कार्ड आल्याचं त्यांना समजलं. पण आपण या कार्डसाठी अर्जच केला नव्हता, असं अरविंद कुमार यांनी सांगितलं.
दरम्यान या प्रकरणी आयकर विभाग आणि पोलिस कसून चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे अरविंद कुमार हे दोन दिवसांपासून गायब असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावरील पोलिसांचा संशय देखील वाढला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement