PM Modi : शेतातील पाचटापासून होणार बायो फ्युअल इथेनॉलची निर्मिती, पंतप्रधान मोदींकडून 900 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन
शेतातील पाचटापासून होणार बायो फ्युअल इथेनॉलची निर्मिती, पंतप्रधान मोदींकडून 900 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घघाटन
PM Modi : जागतिक जैवइंधन दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथे 2G इथेनॉल संयंत्र प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाची किंमत अंदाडे 900 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे, त्याशिवाय अनेकांना रोजगारही मिळणार आहे. त्याशिवाय हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 3 लाख टन कार्बन डायऑक्साईड समतुल्य उत्सर्जनाच्या समतुल्य हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यात योगदान देईल. म्हणजेच देशातल्या रस्त्यांवरून दरवर्षी सुमारे 63,000 गाड्या हटवण्यासमान आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्या लोकांना राजकीय स्वार्थासाठी अथवा राजकीय समस्यांपासून वाचण्यासाठी शॉर्टकट वापरलाय, त्यातून त्यांना कायमस्वरुपी समाधान मिळणार नाही. शॉर्टकट वापरणाऱ्यांना काही वेळासाठी फायदा नक्कीच होईल. राजकीय फायदा होईल. पण समस्या कमी होणार नाहीत.
शॉर्ट-कट वापरल्यामुळे शॉर्ट-सर्किट होण्याची शक्यता आहे. शॉर्ट-कट वापरण्याएवजी आमचे सरकार समस्याचं कायमस्वरुपी समाधान शोधण्याच प्रयत्न करते. पाचोट्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. त्यांना अनेकदा याबाबत विचारण्यातही आले. पण शॉर्टकट वाले याचं समाधान देऊ शकले नाहीत. आम्ही याचं कायमस्वरुपाची उपाययोजना केली आहे.
2G Ethanol Plant in Panipat will help boost production and usage of biofuels in the country. https://t.co/f5P4eKFa6E
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2022
900 कोटी रुपयांचा 2G इथेनॉल संयंत्र राष्ट्राला समर्पित -
जागतिक जैवइंधन दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथे 2G इथेनॉल संयंत्र राष्ट्राला समर्पित केला. देशात जैवइंधनाचे उत्पादन आणि वापराला चालना देण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या अनेक उपाययोजनांच्या मालिकेचा हा भाग आहे. ऊर्जा क्षेत्राला अधिक किफायतशीर, सुगम्य, कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्याच्या पंतप्रधानांच्या निरंतर प्रयत्नांच्या हे एक यश आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे अंदाजे 900 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे 2G इथेनॉल संयंत्र उभारण्यात आले आहे. अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित, हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 3 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे 2 लाख टन पेंढा (पाचट ) वापरून कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय सुरु करेल.
कृषी-पिकांच्या अवशेषांचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम बनवले जाईल तसेच त्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळेल. या प्रकल्पामुळे संयंत्र परिचलनात सहभागी असलेल्या लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि पेंढा कापणे, हाताळणी, साठवणूक आदी साठी पुरवठा साखळीत अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केला जाईल. या प्रकल्पात शून्य द्रव विसर्जन असेल. धानाचा पेंढा (पाचोटा ) जाळण्याचे प्रमाण कमी करून, हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 3 लाख टन कार्बन डायऑक्साईड समतुल्य उत्सर्जनाच्या समतुल्य हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यात योगदान देईल. म्हणजेच देशातल्या रस्त्यांवरून दरवर्षी सुमारे 63,000 गाड्या हटवण्यासमान आहे.