एक्स्प्लोर

26th July In History: मुंबईत ढग फुटल्यासारखा पाऊस, 26 जुलैच्या त्या पावसात एक हजाराहून जास्त मुंबईकरांनी जीव गमावला, भारताने कारगिल युद्ध जिंकले; आज इतिहासात

26th July Important Events : आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि कारगिल युद्ध जिंकलं. त्यानिमित्ताने देशात 26 जुलै हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 

26th July Important Events : जून महिन्याच्या अखेरीस देशाच्या सर्व भागात पावसाची टीपटिप ऐकू येते आणि जुलैमध्ये मान्सून जोरात सुरू असतो. पण 26 जुलै 2005 रोजी ढगांतून पाऊस पडत नव्हता तर एक वादळ आलं होतं. मुंबईमध्ये त्या दिवशी पडलेल्या पावसाने कहर केला आणि त्यामुळे मुंबई थांबली. मुंबईची लोकल असो वा बस, सगळ्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. या दिवशी झालेल्या पावसामुळे एक हजाराहून अधिक मुंबईकरांनी आपला जीव गमावला. 

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 26 जुलै या तारखेला नोंदवलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे,

1844: भारतातील आघाडीचे शिक्षणतज्ञ गुरुदास बॅनर्जी यांचा जन्म.

1876: कलकत्ता येथे इंडियन असोसिएशनची स्थापना.

1945: विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

1951: नेदरलँड्सने जर्मनीशी युद्ध संपवले.

1953: कम्युनिस्ट क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्यूबन क्रांतीची सुरुवात.

1956 : इजिप्तने सुएझ कालव्यावर कब्जा केला

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांच्या पाठिंब्यावर अरब प्रदेशात ज्यू धर्मियांच्या इस्त्रायल हा देश वसला. पण त्यामुळे अरब देशांमध्ये मात्र असंतोष पसरला. त्यानंतर युरोपियन देशांची कोंडी करण्यासाठी इजिप्तचे (Egypt) राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर (Gamal Abdel Nasser) यांनी सुएज कालव्याचं (Suez Canal Crisis) राष्ट्रीयीकरण केलं आणि 26 जुलै 1956 रोजी त्याचा ताबा घेतला. पण त्यामुळे सुएज क्रायसिसचा प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा एकदा जागतिक युद्ध होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. 

1965 - मालदीव ब्रिटीशांच्या ताब्यातून स्वतंत्र झाला.

1974 - फ्रान्सने मुरूरा बेटावर अणुचाचणी केली.

1999 : भारताने कारगिल युद्ध जिंकले, आज विजय दिवस

कारगिल विजय दिवस (Vijay Divas) हा देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस भारतात दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी, 1999 मध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये कारगिल युद्ध (Kargil War) झाले. सुमारे 60 दिवस चाललेल्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आणि विजय मिळवला. कारगिल विजय दिवस हा दिवस युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या युद्धात 527 सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आणि सुमारे 1400 जखमी झाले.

2005 : मुंबईत विक्रमी पाऊस आणि मोठं नुकसान

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कधीच थांबत नाही असं म्हणतात. पण 26 जुलै 2005 रोजी झालेल्या पावसामुळे (26 July 2005 Mumbai Rain) मुंबई थांबली. या मायानगरीने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस अनुभवला होता. या पावसामध्ये एक हजाराहून अधिक मुंबईकरांनी आपला जीव गमावला होता. तर तब्बल 15 हजारांच्या आसपास घरं उद्ध्वस्त झाली आणि नागरिक रस्त्यावर आले. त्या दिवशी दिवसभर पडणाऱ्या पावसाने विक्रम केला. एकाच दिवसात तब्बल 944 मिमी पाऊस पडला. मुंबईच्या इतिहासातील गेल्या 100 वर्षांतील सर्वात मोठा पाऊस होता. 

ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि कधीही न थांबणारी मुंबई स्तब्ध झाली होती. मुंबईची लोकल, बस... या सर्वच ठिकाणी नागरिक अडकून पडले होते. मुंबईच्या या पावसात जवळपास साडेपाच अब्ज रुपयांचं नुकसान झाल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालं. या पावसानंतर राज्य सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरणवादी अभ्यासक डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने 2006 साली आपला अहवाल दिला. 

2007: पाकिस्तानने अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र बाबर हत्फ-7ची यशस्वी चाचणी केली.

2008: युरोपियन शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर आणखी एक नवीन ग्रह शोधला.

2008: गुजरातमधील अहमदाबाद शहरात 21 बॉम्बस्फोट, 56 लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget