एक्स्प्लोर
21 वर्षीय तरुणाचा 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, आरोपीच्या बापाकडून पीडितेची हत्या
आरोपी राजेंद्रने सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. मुलाला पाठीशी घालण्यासाठी त्याचा 51 वर्षीय बाप रामशरणने पीडितेची गळा दाबून हत्या केली.
![21 वर्षीय तरुणाचा 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, आरोपीच्या बापाकडून पीडितेची हत्या 21 years old Man rapes minor girl, father of accuse kills victim 21 वर्षीय तरुणाचा 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, आरोपीच्या बापाकडून पीडितेची हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/07120301/rape.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : सात वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी दिल्लीत बापलेकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 21 वर्षांच्या तरुणाने चिमुकलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला, तर मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी पीडितेची हत्या केली. राजधानी दिल्लीतील निहाल विहारमध्ये हा भयावह प्रकार घडला.
आरोपी राजेंद्रने सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. मुलाला पाठीशी घालण्यासाठी त्याचा 51 वर्षीय बाप रामशरणने पीडितेची गळा दाबून हत्या केली.
पीडित चिमुकली बहिणीसोबत चायनीज पदार्थ आणण्यासाठी गेली होती. नशेच्या आहारी गेलेल्या आरोपीने त्यावेळी तिचं अपहरण केलं. त्यानंतर राजेंद्रने तिच्यावर बलात्कार केला. आपल्या मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी रामशरणने तिची गळा दाबून हत्या केली आणि ओळख पटू नये, यासाठी दगडाने तिचा मृतदेह ठेचला
आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फूटेजेस तपासली. एका फूटेजमध्ये आरोपी बापलेक स्कूटरवरुन एक बॅग नेताना दिसत आहेत. चौकशी केल्यानंतर या बॅगेत मृतदेह असल्याचं समोर आलं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते दोघं गेल्याचं चौकशीत उघड झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)