एक्स्प्लोर

सिद्धूंना भोवणार 35 वर्षे जुने रोड रेज प्रकरण? शिक्षेत वाढ करण्यासाठी याचिका दाखल, दोन आठवड्यानंतर सुनावणी

रोड रेज प्रकरणी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नुकतेच पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ज्याचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे. याच दरम्यान पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे अडचणीत सापडले आहेत. रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण 35 वर्ष जुने असून याआधीही याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याने सांगितलं आहे की, याप्रकरणी अधिक तपास करण्याची आवश्यकता आहे. ज्या घटनेत एखाद्याचा मृत्यू झाला आहे, त्या घटनेत केवळ सदोष मनुष्यवधाचे कलम लावणे चुकीचे असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने सिद्धू यांना उत्तर देण्यास सांगितले असून याची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार असल्याचं म्हटले आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीत हे प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. 

काय आहे प्रकरण? 

1988 मध्ये पंजाबमधील पटियाला येथे झालेल्या या घटनेत गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला होता. सिद्धू आणि त्याचा मित्र कंवरसिंग संधू यांना पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने ही हत्या हेतुपूर्वक केली नसल्याने त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण जुलै 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संधूची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली. तर सिद्धूला केवळ सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. याप्रकरणी त्यांना केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

याविरोधात गुरनाम सिंग यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 13 सप्टेंबर 2018 रोजी न्यायालयाने याचिका विचारार्थ स्वीकारली. मात्र त्यानंतर केवळ शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवरच विचार करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याचा अर्थ असा होता की, सिद्धू यांच्या विरोधात मनुष्यवधाचा खटला चालवला जाणार नाही. तत्पूर्वी, आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना केवळ आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत दोषी ठरवले होते. जे सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणांमध्ये लागू होते. या कलमात शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीचा विचार केला जाणार आहे. या कलमात जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. मात्र, सिद्धूला केवळ दंड आकारून सोडून देण्यात आले होते.

दरम्यान, शुक्रवारी हे प्रकरण न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या विशेष खंडपीठासमोर मांडण्यात आले. याचिकाकर्ते जसविंदर सिंग (आता त्यांचे निधन झाले आहे) यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायाधीशांसमोर यापूर्वीच्या दोन निकालांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, 'विरसा सिंग विरुद्ध पंजाब, 1958' आणि 'रिचपाल सिंग मीना विरुद्ध घासी, 2014' या निकालांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मारहाणीनंतर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे कलम लागू करणे चुकीचे आहे. न्यायालयाने या खटल्याची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी लुथरा यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget