एक्स्प्लोर

West Bengal Road Accident: पश्चिम बंगालच्या नादियात भीषण रस्ता अपघात; 17 ठार, पाच जखमी

West Bengal Road Accident: ही घटना हंसखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडली.

West Bengal Road Accident: पश्चिम बंगालच्या नादिया (Nadia) जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झालाय. तर, 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. ही घटना हंसखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तर 24 परगणामधील बगदा येथून 20 हून अधिक लोक मृतदेह घेऊन मॅटाडोर येथील नवदीप स्मशानभूमीकडे जात असताना ही घटना घडली. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार, फुलबारी परिसरात रस्त्याच्या कडेला एक दगडांनी भरलेली ट्रक उभी होती. या ट्रकला मॅटाडोरनं धडक दिली. या अपघातात 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर, 5 जण जखमी झाले. जखमींवर शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्यानं हा अपघात घडल्याचे सांगितलं जातंय. याप्रकरणी हंसखली पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेवर नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केलंय. 

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात झालेला रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय. 

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी या अपघातावर शोक व्यक्त केलाय. नादिया जिल्ह्यात, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय तर, 5 जण जखमी झाले. ही बातमी ऐकून मला खूप दुःख झालंय. मृतांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत, असं ट्विट त्यांनी केलंय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्यानं हा अपघात झाला. या प्रकरणाच्या पोलीस तपास करीत आहेत. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 एप्रिल 2026 | गुरुवार
Raja Ravi Varma : राजा रवि वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण पेंटिंगची 167.2 कोटींना विक्री, सायरस पुनावाला यांनी लावली विक्रमी बोली
राजा रवि वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण पेंटिंगची 167.2 कोटींना विक्री, सायरस पुनावाला यांनी लावली विक्रमी बोली
Andhra Pradesh Assembly Election: अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
Parth Pawar: सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!

व्हिडीओ

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report
Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026, KKR vs SRH Highlights  : सनरायजर्स हैदराबादचा 65 धावांनी दणदणीत विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
Ashok Kharat : भोंदू अशोक खऱात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
भोंदू अशोक खऱात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
Embed widget