(Source: Poll of Polls)
वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी, 13 जणांचा दुर्देवी मृत्यू, 15 जण जखमी
RAJGARH Road ACCIDENT : मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये वऱ्हाडाच्या ट्रक्टरचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी मध्यरात्री ट्रॅक्टरची ट्रॉली पटली झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
RAJGARH Road ACCIDENT : मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये वऱ्हाडाच्या ट्रक्टरचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी मध्यरात्री ट्रॅक्टरची ट्रॉली पटली झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात मृत्यू झालेले सर्व प्रवासी हे राजस्तानमधील मोतीपुरा येथील होते. ते लग्नासाठी राजगढ येथील कुलामपुरा येथे जात होते. त्यावेळीच काळाने घाला केला, अन् राजगढ जिल्ह्यातील पिपलोदी चौकी येथे ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. भीषण अपघातबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केलेय.
मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील पिपलोदी येथे रविवारी रात्री उशीरा वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार मुलांसोबत 13 जणांचा मृत्यू झालाय. तर अन्य 15 जण जखमी झाले आहेत. राजगढ जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय. जखमीमधील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना भोपाळ येथील रुग्णालायत नेहण्यात आलेय. या अपघातातील मृताची संख्या वाढण्याची शक्यता नाही, कारण जखमी रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.
Rajgarh Accident | President of India tweets, "The news of the death of many people in a road accident in Rajgarh district of Madhya Pradesh is very sad. I express my deepest condolences to the families who lost their loved ones and pray for the speedy recovery of the injured." pic.twitter.com/f5qwZ7sHPi
— ANI (@ANI) June 2, 2024
एका अन्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, वऱ्हाडी हे सर्व राजस्थानमधील मोतीपुरा गावातील होते. ते लग्नासाठी मध्यप्रदेशमधील कुलमपूर येथे जात होते. त्यावेळी पिपलोदी चौकीजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पलटी झाल्यानं भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर 30 वऱ्हाडी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर पुढच्या काही तासांत पोलीस अन् इतर पथके दाखल झाले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही दुर्घाटनास्थळी उपस्थित होते.
सीएम आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केले दु:ख
राजगढमध्ये वऱ्हाडाच्या ट्रक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केलेय.
Rajgarh Accident | Madhya Pradesh CM Mohan Yadav says, "The news of the untimely death of 13 people from the Jhalawar district of Rajasthan due to the overturning of a tractor-trolley on Piplodi Road in Rajgarh district is extremely sad. Leader Narayan Singh Panwar along with the… pic.twitter.com/RnzgNV5y0m
— ANI (@ANI) June 2, 2024