एक्स्प्लोर
व्यवहारांमध्ये घोटाळा कराल तर खबरदार, RBI चा बँकांना इशारा
मुंबई : नोटाबंदीनंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे 12.44 लाख कोटी जमा झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आरबीआयने बँक व्यवहारांमध्ये घोटाळे करणाऱ्यांनाही इशारा दिला.
8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंतच्या सर्व बँक व्यवहार आणि चेक व्यवहारांवर सीसीटीव्हीची नजर आहे. त्यामुळे हेराफेरी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून बँकांना सतर्क राहण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.
दरम्यान नोटाबंदीनंतर देशभरात नोटाबदलीच्या अनेक घटना समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक अधिकारी या प्रकरणी जाळ्यात सापडला आहे. जुन्या नोटा बदलून देत असल्याच्या आरोपातून सीबीआयने बंगळुरुत संबंधित अधिकाऱ्याला अटक केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बंगळुरु शाखेतील के मायकल या सीनियर स्पेशल असिस्टंट पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. एकूण तिघा जणांना सीबीआयने अटक केली असून दहा महत्त्वाची कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत.
एक कोटी 51 लाख 24 हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्याचा आरोप तिघांवर आहे. स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या कोलेगला शाखेत जुन्या नोटांच्या मोबदल्यात नव्या नोटा दिल्या जात असल्याची माहिती आहे. तिघांकडून 16 लाख 84 हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement