एक्स्प्लोर
मंत्र्यांवर चप्पलफेक, अध्यक्षांच्या दिशेने कागदफेक आणि 12 विधेयकं मंजूर
चंदीगड : पंजाब विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस आमदार तरलोचन सिंह यांनी चक्क सत्ताधारी बाकांच्या दिशेने चप्पल फेकली. ही चप्पल पंजाबचे महसूल मंत्री विक्रम सिंह मजिठिया यांच्या पोटाला लागली.
या प्रकारावेळी विरोधी बाकांवरील आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कॅगच्या अहवालाचे कागद फेकत होते. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. याच गोंधळात सत्ताधारी पक्षाकडून एकूण 12 विधेयकं मंजूर करुन घेतली.
विधानसभेच्या अध्यक्षांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला. या घटनेनंतर सभागृहात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. संतप्त सदस्य सभागृह अध्यक्षांच्या स्थानापर्यंत पोहोचणार नाहीत, यासाठी त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांनी कडं तयार केल होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement