एक्स्प्लोर
Advertisement
15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या दहा रंजक गोष्टी
मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्त्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा ते या जल्लोषात सहभागी झाले नव्हते.
भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित दहा रंजक गोष्टी
- भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या बंगालच्या नोआखलीमध्ये होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सुरु असलेला धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी ते उपोषण करत होते.
- 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झालं, त्यावेळी जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र लिहिलं. या पत्रात लिहिलं होतं की, “15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात. यात सहभागी व्हा आणि आशीर्वाद द्या.”
- गांधी यांनी या पत्राचं उत्तर असं पाठवलं की, “कलकत्तामध्ये हिंदू-मुस्लिम एकमेकांचा जीव घेत असताना मी जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकतो? दंगल रोखण्यासाठी मी माझे प्राण देईन.”
- जवाहरलाल नेहरु यांनी ऐतिहासिक भाषण अर्थात ‘ट्रिस्ट विथ डेस्टनी’ 14 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हॉईसराय लॉजमधून (सध्याचं राष्ट्रपती भवन) दिलं होतं. तेव्हा नेहरु पंतप्रधान बनले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकलं, पण गांधीजी त्या दिवशी नऊ वाजताच झोपले होते.
- 15 ऑगस्ट, 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी त्यांच्या कार्यालयात काम केलं. दुपारी नेहरुंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळाची यादी सोपवली आणि त्यानंतर इंडिया गेटजवळ प्रिन्सेस गार्डनमध्ये एक सभेला संबोधित केलं.
- प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी असं झालं नव्हतं. लोकसभा सचिवालयाच्या एका पत्रानुसार, “नेहरुंनी 16 ऑगस्ट, 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता.”
- भारताचे तत्कालीन व्हॉईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे माध्यम सचिव कॅम्पबेल जॉनसन यांच्या माहितीनुसार, “जपानच्या शरणागतीची दुसरं वर्ष 15 ऑगस्टला होणार होतं. त्याच दिवशी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय झाला.”
- 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा निश्चित झाली नव्हता. याचा निर्णय 17 ऑगस्ट रोजी रेडक्लिफ लाईनच्या घोषणेद्वारे झाला.
- भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला खरा, पण देशाचं स्वत:चं राष्ट्रगीत बनलं नव्हतं. रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्येच ‘जन-गण-मन’ लिहिलं होतं, परंतु 1950 मध्ये त्याची राष्ट्रगीत म्हणून अधिकृत निवड झाली.
- 15 ऑगस्त हा भारतासह इतर तीन देशांचाही स्वातंत्र्यदिन आहे. दक्षिण कोरिया जापानपासून 15 ऑगस्ट, 1945 रोजी स्वतंत्र झाला होता. ब्रिटनपासून बहरीन 15 ऑगस्ट, 1971 रोजी आणि फ्रान्सपासून कांगो 15 ऑगस्ट, 1960 मध्ये स्वतंत्र झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement