एक्स्प्लोर
पंजाबमधील नाभा जेलवर हल्ला, 6 कैद्यांना घेऊन हल्लेखोर पसार
चंदीगढ (पंजाब) : पंजाबमधील नाभा जेलमध्ये 10 बंदुकधाऱ्यांनी हल्ला करून खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हरमिंदर सिंह मिंटूला त्याच्या पाच साथीदारांसह पळवून नेले आहे. या घटनेनंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
10 बंदुकधारी हे पोलिसांचे कपडे परिधान करुन आले होते. यावेळी झालेल्या चकमकीवेळी 100 राऊंड फायर केले गेले. पोलीस आणि सैन्यदल घटनास्थळी पोहोचले असून आरोपींना पकडण्यासाठी तपासकार्य सुरु झालं आहे. मिंटूसोबत गँगस्टर विकी गोंडर, गुरप्रीत शेखो, नीता देओल आणि विक्रमजीत सिंह यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे पंजाबमधील इतर जेलच्या तुलनेत नाभा जेल अधिक सुरक्षित जेल मानलं जाते.
हरमिंदर सिंह मिंटू कोण आहे?
हरमिंदर सिंह मिंटू खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख आहे. दोन वर्षांआधी पंजाब पोलिसांनी मिंटूला मलेशियामधून अटक केली. पाकिस्तानच्या माध्यमातून भारतात मोठी दहशतवादी कारवाई करण्याचा मिंटूचा हेतू होता. त्याचवेळी मलेशिया पोलिसांच्या मदतीने पंजाब पोलिसांनी मिंटूला गजाआड केले.
विकी गोंडर कोण आहे?
नाभा जेलमधून पळालेल्या सहा जणांमध्ये गँगस्टर विकी गोंडरचाही समावेश आहे. विकी गोंडर हा मुक्तसरचा रहिवाशी आहे. सुख्खा कांलवा या गँगस्टरची विकीने हत्या केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement