एक्स्प्लोर

IAS Sonia Sethi Transferred: ऐन अतिवृष्टीच्या काळात मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठी यांची बदली; काँग्रेसकडून प्रश्नांची सरबत्ती

IAS Sonia Sethi Transferred: आपत्ती काळात मदत आणि पुनर्वसन विभाग मोठी भूमिका बजावत असतो. मात्र याच काळात मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रमुख सोनिया सेठी यांची अचानक बदली करण्यात आली आहे.

Marathwada Rains : मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना झाला असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. परिणामी, सरकारकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक नुकसाभरपाई मिळेल अशी, अशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, आपत्ती काळात मदत आणि पुनर्वसन विभाग मोठी भूमिका बजावत असतो. मात्र याच काळात (Marathwada Rain) मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रमुख सोनिया सेठी (IAS Sethi Transferred) यांची अचानक बदली करण्यात आली आहे. राज्यात ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती ओढवली असताना अशा महत्वाच्या वेळी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रमुखांची बदली करण्यात आल्याने अनेक उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

काँग्रेसकडून सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका(Congress Criticizes Government Decision)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती दरम्यान महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी यांची बदली केली. दरम्यान याच मुद्दयांवर बोट ठेवत काँग्रेसने सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या आदेशानुसार, विनिता वेद सिंघल यांनी सेठी यांची जागा घेतली आहे. सेठी यांना महानगरपालिका संचालित बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाचे महाव्यवस्थापक बनवण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बदलीचा हा निर्णय वेळेवर आणि औचित्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, विशेषतः अशा वेळी जेव्हा राज्यातील अनेक भाग गंभीर पुराचा सामना करत आहेत.

प्रशासन आणि राज्य यंत्रणेतील समन्वयाचा अभाव-सचिन सावंत

पूरग्रस्त भागात मदत कार्यात समन्वय साधणे, नुकसानीचे मूल्यांकन करणे आणि पुनर्वसन उपाययोजनांवर देखरेख करणे ही विभागाची भूमिका महत्त्वाची असताना, ही बदली अचानक का करण्यात आली? पुढे सावंत यांनी विचारले की हे एक नियमित प्रशासकीय निर्णय आहे की शिक्षेचा एक प्रकार आहे. ते म्हणाले की पूर परिस्थिती बिकट होत चालली आहे, अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि या निर्णयामुळे विभागात गोंधळ निर्माण होऊ शकतो. सावंत यांनी दावा केला की, "नवीन अधिकाऱ्याला विभागाचे कामकाज समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ लागेल, ज्यामुळे महत्त्वाचे मदत आणि पुनर्वसन काम मंदावेल. हा निर्णय खराब प्रशासन आणि राज्य यंत्रणेतील समन्वयाचा अभाव दर्शवितो. या बदलीमुळे सरकारच्या तयारी आणि प्राधान्यांबद्दल शंका निर्माण होतात." असेही ते म्हणाले.

आणखी वाचा 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget