HSC Exam : बुलढाण्यात दारू अन् बियर बॉटल्सच्या विळख्यात विद्यार्थ्यांची परीक्षा; तर जालन्याच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहद्दरांचा सुळसुळाट
विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असलेली बारावीची परीक्षा चक्क विद्यार्थ्यांना दारू आणि बियर च्या बॉटलच्या विळख्यात बसून द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

HSC Exam : विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असलेली बारावीची (12th exam) परीक्षा चक्क विद्यार्थ्यांना दारू आणि बियर च्या बॉटलच्या विळख्यात बसून द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार बुलढाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज बघायला मिळाला आहे. तर दुसरीकडे जालना (Jalna) जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियानाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळालं आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा कॉपी मुक्त आणि सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने केलेली अंमलबजावणी या परीक्षा केंद्रांवर मात्र फेल झाल्याचे दिसून आले आहे.
परीक्षा केंद्रावर कॉपी बहद्दरांचा सुळसुळाट
जालना (Jalna) जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या ढोकसाळ येथील बारावीच्या इंग्लिश पेपरला कॉपी बहद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. जिल्ह्यात बारावी परीक्षेचे एकूण 82 केंद्रातून जवळपास 36 हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. मात्र पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या कॉपी मुक्ती अभियानाची झलक कॉफी बहद्दरांनी दाखवून दिली आहे.
बुलढण्यात दारू अन् बियर बॉटल्सच्या विळख्यात विद्यार्थ्यांची परीक्षा
दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज बघायला मिळाला. जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बाक स्वच्छ नव्हते. तर काही ठिकाणी दारू अन् बियर बॉटल्सच्या विळख्यात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागत आहे. तसेच काही केंद्रावर वॉशरूम व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही नव्हती आणि त्यामुळे पालकांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे. परिणामी, संतप्त पालकांनी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध नोंदवला आहे.
ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर अन् पालकांना ही सूचना
बारावीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर ठेवली जात आहे. ड्रोन द्वारे अनाउन्समेंट देखील केली जाती आहे .पालकांना सूचना केल्या जात आहेत. कॉपी देणाऱ्या नाही इशारा दिला जातोय .शहरात स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये अशाच पद्धतीने ड्रोनच्च्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली.
हे ही वाचा
- स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
- Ahmednagar News : इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण केल्याची चर्चा, पाथर्डीमधील 12 वीच्या परीक्षा केंद्रावरील घटना
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

