Nitin Gadkari : हिंगोलीची हळद साता समुद्रापार गेली पाहिजे - गडकरी
Nitin Gadkari : वाशिम हिंगोली जिल्ह्यांमध्ये 13 कामे मंजूर होती, त्यातील जवळपास सहा हजार कोटी रुपये मंजूर केली होती. त्यापैकी सहा कामे पूर्ण झाली आहेत.

Nitin Gadkari : आज हिंगोलीमध्ये महामार्गाचे लुकार पण आणि विकास कामाच्या भूमिपूजनासाठी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला भाजपचे नेते मंडळी त्याचबरोबर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची सुद्धा उपस्थिती होती. चांगल्या महामार्गाच्या माध्यमातून हिंगोलीच्या हळदीला सातासमुद्रापार विक्रीसाठी नेता आलं पाहिजे, असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्याचबरोबर नागरिक उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले की, तान्हाजी मुटकुळे माझ्याकडे 5-7 वेळा आले. नामदेव महाराजांच्या जन्मस्थळी रस्ता करण्यासाठी माझ्याकडे मागणी केली. मी सांगितलं करून देतो परंतु हा रस्ता महामार्ग नाही. म्हणून ते काम फेटाळले जायचे. आज येताना मी पहिल्यांदा एक काळजी घेतली ह्या रस्त्याला सीआरएफमधून मंजूर करून घेतले आहे. त्याचं काम आता लवकर सुरू होईल. मी जे जनतेला आणि तानाजी मुटकुळे यांना वचन दिलं होतं, ते आज पूर्ण झाले. याचा मनापासून आनंद असल्याचे गडकरी यांनी म्हटले.
वाशिम हिंगोली जिल्ह्यांमध्ये 13 कामे मंजूर होती, त्यातील जवळपास सहा हजार कोटी रुपये मंजूर केली होती. त्यापैकी सहा कामे पूर्ण झाली आहेत. सात कामे प्रगती पथावर आहेत. आज वाशिम ते वारंगा या महामार्गाचा चौपदरीकरण झालं याचा मला खूप आनंद आहे, असे गडकरी म्हणाले. कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करणार नाहीत विकासकामे ही देशाची संपत्ती आहे. त्या संपत्तीचे मालक हे माझ्यासमोर बसले आहेत तुमच्या आशीर्वादाने गेल्या सात आठ वर्षांमध्ये 50 लाख कोटी रुपयांची कामे करण्याची संधी मिळाली आहे. या कामासाठी एकाही कॉन्ट्रॅक्टरला काम मंजूर करण्यासाठी माझ्या घरी यायची गरज पडली नाही, असेही गडकरी म्हणाले.
वारंगा फाटा जवळील रस्त्याचे काम बंद पडलं, त्या कंपनीला मी टर्मिनेट केलं. आता त्या रस्त्याचा नवीन टेंडर काढला आहे. पुढील महिन्यांमध्ये माहूरला भूमिपूजन करता येणार आहे. त्यामुळे मी सांगितलं रस्त्यांना रिपेअर करा, घरच्यांची इच्छा आहे. माहूरला जाण्याची त्यामुळे मी जेव्हा माहूर राहील तेव्हा हा रस्ता चांगल्या अवस्थेमध्ये मिळेल, असे गडकरी म्हणाले.
हळदी करता प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्हा फक्त भारतात नाही तर जगाच्या नकाशावर आणा. त्यामुळे आपली हळद साता समुद्रापार जाईल आणि आपला शेतकरी समृद्ध होईल नक्कीच आसा मला विश्वास आहे. अकोला वाशिम हिंगोली वारंगा फाटा या महामार्गाचे काम साडेचार हजार कोटी रुपयांच आहे. एक नवीन रस्ता मंजूर केला आहे इंदूर ते मुक्तानगर मुक्ताईनगर ते अकोला वाशिम हिंगोली पुढे हैद्राबाद कडे जाणार आहे. त्यामुळे हैदराबादला चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, असे गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
