आधी ढसाढसा रडून, नंतर बंडखोरी करणाऱ्या संतोष बांगर यांना शिवसेना धक्का देणार?
Shiv Sena Rebel MLA Santosh Bangar : शिवसेना बांगर यांना धक्का देण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष पदावरुन बांगर यांची हकालपट्टी होऊन नवा जिल्हाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे.
Shiv Sena Rebel MLA Santosh Bangar : बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत ठाकरेंसोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरांच्या बसमध्ये दिसून आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, त्यावेळी हेच संतोष बांगर ढसाढसा रडले होते. अख्ख्या मराठवाड्यातले शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात होते, फक्त संतोष बांगर ठाकरेंसोबत उभे होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी ढसाढसा रडलेही होते. पण स्वतःला सच्चा शिवसैनिक म्हणवणारे बांगर अवघ्या 24 तासांत शिंदे सैनिक झाला. पण आता शिवसेना संतोष बांगर यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
एकीकडे नव्या सरकारचं शक्तीप्रदर्शन सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांबाबत कार्यकर्त्यांमधून काही ठिकाणी नाराजीही समोर आली आहे. बहुमत चाचणीआधी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे हिंगोलीतील शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. बांगर यांच्या बंडखोरीचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. तसंच शिवसेना बांगर यांना धक्का देण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष पदावरुन बांगर यांची हकालपट्टी होऊन नवा जिल्हाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे.
बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत ठाकरेंसोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरांच्या बसमध्ये दिसून आले. त्यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी हिंगोली शहरात शिवसैनिकांची बैठक घेतली. या बैठकीत थेट उध्दव ठाकरे यांनी फोनवरून शिवसैनिकांशी संवाद साधला. ज्यांना आपण दिले ते सोडून गेले ज्यांनी आपल्याला दिलं ते सोबत आहेत, असे बोलत ठाकरे यांनी संतोष बांगर यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आता लढायचं आणि सर्वांना भेटायला मी येणार आहे, आसं आश्वासन यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :