एक्स्प्लोर

'जरांगे म्हणाले सभेला टाकून येऊ नका रे...'; प्रशासनाने थेट सभेच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करून टाकलं

Manoj Jarange Sabha : उद्या होणाऱ्या मनोज जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासनाने हिंगोली आणि औंढा नागनाथ तालुक्यात दारू विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंगोली: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या अनेक रात्रीच्या सभेत काही लोक दारू पिऊन येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, सभेला येताना दारू पिऊन येऊ नका असे अनेकदा मनोज जरांगे आपल्या भाषणातून सांगत आहे. जरांगे यांचे हेच आवाहन लक्षात घेता, उद्या होणाऱ्या त्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासनाने हिंगोली आणि औंढा नागनाथ तालुक्यात दारू विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा आदेशच हिंगोलीचे जिल्हाधिकारी (Hingoli Collector) यांनी काढला आहे.

मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू आहे. उद्या हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा येथे जरांगे यांची सभा होणार आहे. तर, 110 एकरवर होणाऱ्या या सभेत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली आणि औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री उद्या निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे घाऊक आणि किरकोळमध्ये विक्रीची सर्व दुकाने उद्या बंद ठेवावे असे आदेश हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. 

काय म्हटले आहे आदेशात? 

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा येथे गुरुवारी (7 डिसेंबर) रोजी सकल मराठा समाजाचे वतीने मनोज पाटील जरांगे यांची जाहीर सभा आहे. त्यामुळे, हिंगोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी जितेंद्र पांपळकर (भा.प्र.से.) आदेश देत आहे की, 7 डिसेंबर 2023  रोजी औंढा नागनाथ व हिंगोली तालुक्यातील सर्व प्रकारच्या ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्य विक्री व ताडी अनुज्ञप्त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे (कोरडा दिवस ) आदेश देत आहे. सदर आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 56 अंतर्गत कडक कारवाई करण्यांत येईल यांची संबंधीत अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

सभेची अशी तयारी झाली...

मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू आहे. उद्या जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा येथे 110 एकरवर ही सभा होणार आहे. हिंगोली-परभणी रोडवरील डिग्रस फाट्यावर ही सभा होणार असून, याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर, सभेच्या ठिकाणी 40 बाय 20 आणि उंची 12 फुटाच व्यासपीठ तयार करण्यात आला आहे. स्टेजसमोर 200 किलो रांगोळीचे रंग वापरून 35 बाय 40 फूट एवढी मनोज जरांगे यांची रांगोळी काढण्यात आली आहे. सभास्थळी आता सर्व भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता उद्याच्या सभेत जरांगे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

दोन क्विंटल फुलांचा हार, 76 तोफांची सलामी; हिंगोलीत जरांगेंची 110 एकरवर विराट सभा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget