(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli News: सेवा निवृत्त जवानाचा हिंगोलीत राडा; हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर
Hingoli News : या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात (Hingilo District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सेवा निवृत्त जवानाने चक्क हवेत गोळीबार (Firing) करत राडा घातला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या जवानाने मागील काही दिवसात अनेक ठिकाणी हवेत गोळीबार केल्याचं देखील समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यांमध्ये सेवानिवृत्त जवानाचा राडा पाहायला मिळाला आहे. या जवानाने वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होतोय. साहेबराव रणवीर असो या सेवानिवृत्त जवाबाचे नाव असून, एका वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये नाचत असताना या जवानाने चक्क एका व्यक्तीच्य डोक्याला बंदूक लावली. त्या नंतर हवेत दोन राऊंड फायर केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर याच जवानाने काल एका हॉटेलमध्ये सुद्धा गोळीबार केला आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आसून, संबंधित सेवानिवृत्त जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सेवानिवृत्त जवानाने वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होतोय. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या जवानाने यापूर्वी देखील अनेक ठिकाणी हवेत गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बंदूक देखील जप्त केली आहे. तसेच त्याने यापूर्वी कोठे कोठे अशाप्रकारे गोळीबार केला आहे याचा देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
थेट डोक्याला बंदूक लावली....
पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्या सेवानिवृत्त जवानाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या या जवानाने त्या ठिकाणी कार्यक्रमात आलेल्या एका व्यक्तीच्या डोक्याला थेट बंदुक लावली होती. त्यामुळे तो व्यक्ती प्रचंड घाबरून गेला. दरम्यान आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये देखील एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे तो एवढ्यावरच थांबला नाही. तर थेट हवेत गोळीबार केला. त्यामुळे प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: