Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाची आत्महत्या
Suicide : पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) टोकाचे पाउल उचलत आत्महत्यांच्या (Suicide) घटना समोर येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी गेला असून, सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने 'मी मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याचे' सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. कृष्णा कल्याणकर (वय 25 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी हिंगोलीच्या देवजना गावामध्ये गेला आहे. आज सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाकडून एक सुसाईड नोट सुद्धा पोलिसांना मिळाली असून, यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचे मयत कृष्णा कल्याणकर या युवकाने लिहून ठेवले आहे. याबाबत माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, पोलिसांकडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
शैक्षणिक फी भरू न शकल्यामुळे मराठा विद्यार्थ्यांने संपवलं आयुष्य
धक्कादायक म्हणजे मागील आठवड्यात देखील एका हिंगोली जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. शैक्षणिक फी भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. महाविद्यालयात शैक्षणिक शिक्षण घेत असताना घरची हालखीची परिस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक फीस भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवलं. परमेश्वर चितरे असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. त्यात आता आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परभणीच्या युवकाने कापली हाताची नस
मराठा आरक्षणाचा मागणा करीत एका 30 वर्षीय युवकाने हाताची नस कापल्याची घटना बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली. जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आकाश वैजनाथराव शिंदे (वय 30 वर्षे) असे जखमी युवकाचे नाव आहे. आकांश शिंदे हा युवक बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. मराठा आरक्षणाची मागणी करीत त्याने काही समजण्याच्या आत स्वतःच्या हाताची नस धारदार वस्तूने कापली. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून शासकीय वाहनाव्दारे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Dhangar Reservation : मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊल, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं