Dilip Mhaske : वंचितच्या उमेदवाराने स्वतःवरच हल्ला करून घेतला, निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी बनाव रचल्याचं उघड
Dilip Mhaske Fake Attack : कळमनुरी मतदारसंघातील वंचितचे उमेदवार दिलीप मस्के यांनी मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्या कारवर हल्ला केल्याचं पोलिस तपासातून उघडकीस आलं.
हिंगोली : सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्या कारवर स्वतःच हल्ला केल्याचा प्रकार हिंगोलीतील वंचितच्या नेत्याने केल्याचं समोर आलं आहे. हिंगोलीतील वंचितच्या दिलीप मस्केंचा यांच्या कारवर 18 नोव्हेंबर रोजी हल्ला झाला होता, त्यामध्ये गाडीचे मोठं नुकसान झालं होतं. आता तो हल्ला त्यांनी स्वतःच केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिलीप मस्के यांना अटक करण्यात आली आहे. संतोष मस्के हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधून दिलीप मस्के यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली होती. दिलीप मस्के यांच्या चार चाकी गाडीवर 18 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हल्ला झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या हल्ल्यात आपल्याला मारहाण झाल्याचा दावा दिलीप मस्के यांनी केला होता. तसेच आपल्याला यामध्ये छातीत मुक्कामारही बसल्याचा दावा त्यांनी केला होता. या हल्ल्यानंतर दिलीप मस्के यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचं दिसत होतं. त्यांच्या डोक्याला पांढरी पट्टी लावल्याचं दिसत होतं.
पोलिसांनी या हल्ल्याचे परिस्थितीजन्य पुरावे तपासले आणि तांत्रिक पुराव्यांचा सुद्धा बारकाईने तपासणी केला. त्यामध्ये दिलीप मस्के यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी प्रकाश चांदिले यांच्यासह चार जणांना वसमत येथून बोलवत स्वतःच्या गाडीवर हल्ला करण्यास सांगितलं होतं. पण साथीदारांनी हा हल्ला करण्यास नकार दिल्याने सुरज राठोड, दिलीप मस्के आणि गाडी चालक रहीम खान पठाण यांनीच ही गाडी फोडून बनाव रचला.
पोलिस तपासात या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. स्वतःचीच गाडी फोडणारे आरोपी सुरज राठोड, दिलीप मस्के आणि आफताब रहीम खान पठाण यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ही बातमी वाचा: