(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची तब्येत खालावली; उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवले
तानाजी मुटकुळे हे हिंगोली विधानसभेचे भाजपाचे आमदार आहेत आहेत. हिंगोलीवरून आमदार तानाजी मुटकुळे यांची रुग्णवाहिका नांदेड विमानतळावर दाखल झाली आहे.
नांदेड : भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांची तब्येत खालावली असून त्यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्बुलन्सने उपचारासाठी मुंबईकडे हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आमदार मुटकुळे यांच्यावर काही दिवसापूर्वी एन्जोप्लास्टी झाली होती. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरू असून यंदा त्यांच्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईकडे हलविण्यात आला आहे.
तानाजी मुटकुळे हे हिंगोली विधानसभेचे भाजपाचे आमदार आहेत आहेत. हिंगोलीवरून आमदार तानाजी मुटकुळे यांची रुग्णवाहिका नांदेड विमानतळावर दाखल झाली आहे. आता, येथून मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना नेण्यात येणार आहे. सध्या हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील सुमठानकर आणि डॉ. विठ्ठल रोडगे यांनीही निवडणुकीवर दावा करुन जनसंपर्क वाढवला आहे. पण आमदार तानाजी मुटकुळे हे गेल्या 10 वर्षांपासून विधानसभेचे नेतृत्व करीत आहेत. तर, यंदा त्यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे हे सुद्धा निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा