एक्स्प्लोर

मोठी बातमी: पहिली ते पाचवीच्या मराठी अन् इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी असेल तृतीय भाषा; पहिलीपासूनच्या सक्तीचा निर्णय अखेर मागे

Mumbai News: राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1 ली ते  5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल.

मुंबई: राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी (Marathi language) व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल. असा भाषाविषयक धोरण या शीर्षकाखालील उपपरिच्छेदामध्ये नमूद करण्यात आले असून शासनाने हा निर्णय जारी केला आहे. 

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अखेर मागे

राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य, असा शासन निर्णय केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करताना मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर पालकांनी, राजकीय नेत्यांनी आणि शिक्षक संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता. याविरोधानंतर सरकारने बाजू मांडत शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अखेर मागे घेत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली होती. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून नवा शासन निर्णय काढण्यात आला आहे. 

इतर भाषा शिकण्यासाठी  किमान 20 विद्यार्थ्यांची इच्छुकता असावी

यात सांगण्यात आले आहे की, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. एकीकडे सरकारने अन्य भाषांचा पर्याय देण्याचा प्रयत्न करत नियम ही दिला आहे. इतर भाषा शिकण्यासाठी  किमान 20 विद्यार्थ्यांची इच्छुकता असावी असे ही यात म्हटले आहे.

दरम्यान, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल. या कार्यवाहीसंबंधीचे सर्व नियोजन हे आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्यास्तरावरून तात्काळ करण्यात येईल. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल. असेही सांगण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill News : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget