Guinness World Record: अभिमानास्पद! वयाच्या सातव्या वर्षी 'लिंबो स्केटिंग'मध्ये देशना नाहरची ‘गिनिज बुक’मध्ये नोंद
पुण्यातील सात वर्षांच्या देशना नहार हिने पुण्याची मान उंचावली आहे. वयाच्या सातव्या वर्षी 'लिंबो स्केटिंग' या अत्यंत अवघड 'स्केटिंग' प्रकारामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर आपलं नाव कोरलं आहे.

Guinness World Record: वयाच्या सातव्यावर्षी स्केटिंगमधील सगळ्यात कठिण प्रकारात माझ्या मुलीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं देशनाचे वडिल आदित्य रसिक नहार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
पुण्यातील सात वर्षांच्या देशना नहार हिने पुण्याची मान उंचावली आहे. वयाच्या सातव्या वर्षी 'लिंबो स्केटिंग' या अत्यंत अवघड 'स्केटिंग' प्रकारामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर आपलं नाव कोरलं आहे. 'लिंबो स्केटिंग' या अत्यंत अवघड 'स्केटिंग' प्रकारामध्ये केवळ 13.74 सेकंदांमध्ये 20 चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग पूर्ण करीत जागतिक रेकॉर्ड करून गीनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. देशनाचे वडिल आदित्य रसिक नहार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
या सात वर्षांच्या तरबेज खेळाडूला पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन केले. देशना ही पुणे येथील हचींग स्कुलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या नव्या कर्तृत्वासाठी तिची आजी दया नाहर यांनीही अथक परिश्रम घेतले आहे. या कामगिरीसाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. देशनाला वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगची आवड निर्माण झाली. तिने गेली दोन वर्ष रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांचा अनुभव पाठीशी घेऊन तिने जागतिक विक्रम करत राज्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे.
गेली दोन वर्षे देशना मनापासून मेहनत घेत स्केटिंग शिकत आहे. तिच्या आजीने तिच्यासाठी विशेष मेहनत घेतली. लहान वयात तिच्या मधील खेळाडूला वाव देण्यासाठी तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न तिच्या आजीने केले, त्यातूनच तिला हे यश मिळाले आहे. वयाच्या सातव्यावर्षी स्केटिंगमधील सगळ्यात कठिण प्रकारात माझ्या मुलीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हा सर्वांना आनंद होतो आहे, अशी प्रतिक्रिया देशनाचे वडील आदित्य नहार यांनी दिली आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
महत्त्वाच्या बातम्या





















