एक्स्प्लोर

Gondia News: शाळेचे 20 वर्षांपूर्वीचे गहाळ रेकॉर्ड आढळले भंगारात, गोंदियातील धामणगाव येथील प्रकार

 शाळेचे दस्तावेज, विद्यार्थ्यांचे टीसी, मार्कलिस्टसह दाखल्यांच्या नोंदी असलेला रेकार्ड चक्क भंगार विक्रेत्याच्या दुकानात सापडल्याची घटना गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील धामणगाव येथे उघडकीस आली.

गोंदिया:  एकीकडे आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी निजामशाहीत नोंद केलेले दाखले शोधून काढले जात आहेत. तर दुसरीकडे 60 वर्ष जुने माजी विद्यार्थ्यांचे दाखले भंगारात विकल्याचं समोर आले आहे.  शाळेचे दस्तावेज, विद्यार्थ्यांचे टीसी, मार्कलिस्टसह दाखल्यांच्या नोंदी असलेला रेकार्ड चक्क भंगार विक्रेत्याच्या दुकानात सापडल्याची घटना गोंदियाच्या (Gondia News) आमगाव तालुक्यातील धामणगाव येथे उघडकीस आली. दरम्यान या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन समितीचा गलथान कारभार पुढे आला असून गावकऱ्यांनी या प्रकाराला घेवून संताप व्यक्त केला आहे. 

आमगाव पंचायत समिती अंतर्गत धामणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेचा रेकार्ड मागील 20 वर्षांपासून गहाळ झाले होते. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पाल्यांचे दाखले व शैक्षणिक कागदपत्रे मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागत होती. यात 1960 पासूनच्या शैक्षणिक रेकार्डचा समावेश होता. मंगळवारी धामणगाव येथील भंगार विक्रेत्याकडे पाच पोत्यांमध्ये खरेदी केलेली रद्दी पडली होती. दरम्यान या विक्रेत्याच्या दुकानात गावातील एक तरुण बसला होता. त्याने पोत्यातील रद्दी पाहिली असता त्यात शाळेचे दाखल खारीज रजिस्टर व इतर दस्तावेज आढळले. त्याने अजून काही कागदपत्रे पाहिली असता त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे दाखल खारीज प्रमाणपत्र आढळले. 

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी पंचनामा करुन कागदपत्रे ताब्यात घेतली

दरम्यान हे पाहून त्याला देखील धक्का बसला. त्यांने याची माहिती गावचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना दिली. त्यांनी भंगार विक्रेत्याच्या दुकानात पोहचत पाचही  पोत्यातील साहित्य तपासले. त्यात धामणगाव शाळेचा 20 वर्षांपूर्वी गहाळ झालेले शैक्षणिक रेकार्ड सापडले. सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी पंचनामा करुन ही कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच या रेकार्डची विक्री भंगार विक्रेत्याला कोणी केली याचा शोध घेतला जात आहे. तर याप्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक यांनी फक्त एक रजिस्टर महत्वाचा होता व बाकी सर्व कामाचे नाहीत असे सांगितले आहे. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी कुठलाही ठराव रद्दी विकल्याचा आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले आहे. एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू असतांना त्यांना 1967 पूर्वीचा नोंद असल्याचा पुरावा मागण्यात येत आहे. तर गोंदीयात चक्क शाळेतील 1960 पासूनचे नोंदीचे रेकॉर्ड रद्दीच्या दुकानात आढळले आहेत. 

हे ही वाचा :  

Crime : कपाटाचं लॉक दुरूस्त करायला आला अन् 11 लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केले, गोंदियातील घटना

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget