एक्स्प्लोर

Amol Mitkari: अजितदादा लोकांच्या मनात; कोणी बॅनरवर फोटो लावो अथवा न लावो, फरक पडत नाही : अमोल मिटकरी

Amol Mitkari: अजित दादा हे लोकांच्या मनामनात आहेत. त्यामुळे कोणी फोटो लावला काय आणि नाही लावला यावरून काहीच फरक पडत नसल्याचं मिटकरी म्हणालेत.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यातील बॅनरवरून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब होता. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी संबोधित केलं. याआधी तटकरे यांनी घेतलेल्या एका मेळाव्यातही अजित पवारांचा फोटो वापरण्यात आला नव्हता. अजित पवारांच्या फोटोवरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पक्षातील नेत्यांना टोला लगावला आहे. अजित दादा हे लोकांच्या मनामनात आहेत. त्यामुळे कोणी फोटो लावला काय आणि नाही लावला यावरून काहीच फरक पडत नसल्याचं मिटकरी (Amol Mitkari) म्हणालेत.

Amol Mitkari: कार्यकर्त्यांची मन दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी

 फोटो न लावणारे लोक लोकांच्या मनातील अजित पवारांना कसे पुसून टाकतील? असा सवालही त्यांनी केला आहे. मात्र, पुढच्या काळात असे प्रकार होणार नाहीत आणि कार्यकर्त्यांची मन दुखावली जाणार नाहीत याची काळजी संबंधित नेत्यांनी घ्यावी, असं आवाहनही आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी याबाबत म्हटलं की, ही गोष्ट खरी आहे की अजितदादांवर प्रेम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे, एखाद्या बॅनरवर दादांचे फोटो नसतील तरी दादा मनातून गेले असं होत नाही, दादा प्रत्येकाच्या घराघरात आहेत मनामनात आहेत, 18 पगड जातीच्या मनात दादा आहेत, त्यामुळे कोणी फोटो टाकले असतील कोणी टाकले नसतील याला त्याला महत्त्व नाही. फोटो टाकले काही नाही टाकले काय त्याने काही फरक पडत नाही, पण माझी विनंती आहे दादांना मानणारा वर्ग पुढे दुखावणार नाही याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी, आणि अजित दादांचा योग्य तो सन्मान व्हावा असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

Amol Mitkari: नेमकं प्रकरण काय?

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, या मेळाव्यासाठी शहरात लावण्यात आलेल्या अधिकृत बॅनरवर एक गोष्ट सर्वांच्या निदर्शनास आली. या बॅनरवर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचे फोटो असताना, पक्षाचा मुख्य चेहरा राहिलेल्या दिवंगत अजित पवार यांचा फोटो मात्र गायब होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा स्थानिक नेत्यांसोबत लहान फोटो बॅनरवर दिसला. 

महत्त्वाच्या बातम्या

JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
Embed widget