एक्स्प्लोर

कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?

सीजेपी प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक घेऊन आंदोलन आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जे. पी नड्डा यांच्याकडे आम्ही आमच्या तीन मागण्या ठेवल्या आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर सरकारकडून बोलणी सुरु असून कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्रीयमंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. तत्पूर्वी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेत सरकारने तीन मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (dharmendra pradhan) यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने अट मान्य केली नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले. त्यानंतर, आज दुपारी जेपी नड्डा यांच्यासमवेत सीजेपीच्या प्रवक्त्यांची बैठक झाली.  

सीजेपी प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक घेऊन आंदोलन आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जे. पी नड्डा यांच्याकडे आम्ही आमच्या तीन मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये, पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यामध्ये कुठलीही तडतोड केली जाणार नाही. यासह मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची आर्थिक मदत, तसेच 20 जुलै रोजी संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख तीन मागण्या कॉकरोच जनता पार्टीने सरकारपुढे मांडल्या आहेत. त्यावेळी, सरकारने दोन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारपर्यंत वेळ मागितला असल्याचे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटले.  

जंतर मंतर आणि संसद परिसरात विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काहींना मुक्का मारही लागला आहे. त्यामुळे, ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच, या दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी सीजेपीने केली आहे. दरम्यान, सरकारसोबत सविस्तर चर्चा झाली असून सरकारने उत्तर देण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ मागितली आहे, असेही सौरव दास यांनी स्पष्ट केले. 

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने सरकारचेच नुकसान - वांगचुक

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने आमचे किंवा मुलांचे नुकसान होणार नाही, उलट त्यांचेच नुकसान होईल. जर त्यांनी (धर्मेंद्र प्रधान) राजीनामा दिला असता, तर त्यांचे सर्व नुकसान टळले असते. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की, आमच्या मुलांवर कोणतेही गुन्हे दाखल होऊ नयेत. आम्ही लडाखमध्ये पाहिले आहे की आयुष्यभरासाठी असलेले एफआयआर भविष्य उद्ध्वस्त करतात, असे सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडताना म्हटले. 

हेही वाचा

सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget