एक्स्प्लोर

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: सोनम वांगचुक यांच्या 3 अटी केंद्र सरकारने मान्य केल्या. परंतु या मागण्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही उल्लेख नाहीय.

Sonam Wangchuk Protest Marathi News: नीट पेपरफुटी प्रकरणातील (NEET Exam Paper Leak) दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk Protest) यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 1.30 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण थांबवण्याची माहिती स्वत: सोनम वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करत दिली. 

एकीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत सुरूच राहणार आहे, असं कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या 3 अटी केंद्र सरकारने मान्य केल्या. परंतु या मागण्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही उल्लेख नाहीय. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय सोनम वांगचुक यांचा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यावर आता सोनम वांगचुक यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्याकडे दोनच पर्याय होते- सोनम वांगचुक (Sonam Wangchuk Protest)

उपोषण संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, सोनम वांगचुक यांनी घडलेल्या घटनांचा तपशील देणारा एक व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला. यामध्ये सोनम वांगचुक म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत काय झाले, असे तुम्ही विचाराल. पहिली गोष्ट म्हणजे, तो राजीनामा कधी दिला जाईल याबद्दल ते मला कोणतेही आश्वासन देऊ शकले नाहीत. ते म्हणाले की यावर संसदेत नक्कीच चर्चा होईल. उपोषण सुरू ठेवू आणि मरुन जाऊ, असे दोनच पर्याय माझ्याकडे होते. आपण काहीही मिळवलेले नाही, असं नाहीय. माझी विचारसरणी वेगळी आहे. हजारो लोकांनी मला सांगितले की माझे जीवन महत्त्वाचे आहे. मला संघर्ष सुरू ठेवून जिवंत राहायचे आहे, असं सोनम वांगचुक म्हणाले. 

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही- सोनम वांगचुक (Sonam Wangchuk On Dharmendra Pradhan)

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने आमचे किंवा मुलांचे नुकसान होणार नाही, उलट त्यांचेच नुकसान होईल. जर त्यांनी (धर्मेंद्र प्रधान) राजीनामा दिला असता, तर त्यांचे सर्व नुकसान टळले असते, असं सोनम वांगचुक यांनी सांगितले. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की, आमच्या मुलांवर कोणतेही गुन्हे दाखल होऊ नयेत. आम्ही लडाखमध्ये पाहिले आहे की आयुष्यभरासाठी असलेले एफआयआर भविष्य उद्ध्वस्त करतात. नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असं सोनम वांगचुक म्हणाले. तसेच ढासळत चाललेल्या परीक्षा पद्धतीतील उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर भारतीय संसदेत चर्चा केली जाईल, असे आश्वासन मला सरकार आणि सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांकडून मिळाले आहे, असंही सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलं. 

केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या कोणत्या अटी मान्य केल्या? (Which of Sonam Wangchuk demands did the Government accept?)

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह, यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत याची माहिती दिली. जेपी नड्डा यांनी सोनम वांगचुक यांना सरकारचे संपूर्ण आश्वासन वाचून दाखवले. यामध्ये केंद्र सरकारने 3 महत्वाच्या अटी मान्य केल्या. 

  1. 20 जुलै रोजी शांततेने आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
  2. परीक्षेसंदर्भात पेपरफुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
  3. नीट (NEET) पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल.

संबंधित बातमी:

Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Caste Validity Certificate Online Process: जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मतदारसंघ फेररचना विधेयकावर चर्चा
Maharashtra Live News Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मतदारसंघ फेररचना विधेयकावर चर्चा
Parth Pawar NCP: मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?
मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?
Jalgaon Shivsena Politics: मंगेश चव्हाणांसोबत काम केले म्हणून हकालपट्टी?; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मंगेश चव्हाणांसोबत काम केले म्हणून हकालपट्टी?; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
Embed widget