एक्स्प्लोर

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

Shivsena Meeting : नेत्यांनी जर रोजच्या कामाचे अपडेट दिले नाही तर त्यांना थेट नारळ दिला जाईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. तसेच मतदारयाद्यांवर फोकस करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाछ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या नव्याने नियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांची ऑनलाईन बैठक घेत पक्ष संघटनेचा सखोल आढावा घेतला. या बैठकीत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत 'काम नाही तर पदही नाही' असा कडक संदेश दिला. बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार ही पदं बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले. पक्ष वाढीसाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

Shivsena Review Meeting : प्रत्येक पदाधिकाऱ्याची वैयक्तिक विचारणा

एकनाथ शिंदेंनी प्रत्येक संपर्क प्रमुखाला थेट प्रश्न विचारत कामाचा हिशोब मागितला. आतापर्यंत किती BLA नेमले, किती वेळा मतदारसंघात भेटी दिल्या, किती बैठका घेतल्या, याची सविस्तर माहिती मागवण्यात आली. कामगिरी समाधानकारक नसल्यास थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला.

Eknath Shinde Strict Orders : काम नाही तर थेट नारळ मिळणार

संपर्कप्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कामाचा नियमित अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. काम केल्याची अपडेट आली नाही, तर थेट नारळ दिला जाईल, असा इशारा शिंदेंनी बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बैठकीचे फोटो आणि तपशील रोज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

Shivsena Election Strategy : प्रत्येक मतदारावर लक्ष केंद्रित

मतदारसंघांचे संभाव्य विभाजन लक्षात घेऊन प्रत्येक मतदार यादीनुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक मतदार यादीवर दोन BLA नेमून त्यांच्यासोबत नियमित बैठक घेण्यास सांगितले.

सध्या निवडणुका नसल्याने एकनाथ शिंदे यांचा भर पूर्णपणे पक्ष संघटना वाढीवर असल्याचं स्पष्ट झालं. महाराष्ट्रातील सर्व 43 हजार गावांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवे, असा आदेशही त्यांनी दिला.

Shivsena Pune : पुण्यातील कार्यकारिणी बरखास्त

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला आहे. पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली गेली.  यातून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेशही दिले आहेत.

आता निवडणूक नसल्याने एकनाथ शिंदेंचं संपूर्ण लक्ष हे पक्ष संघटना वाढीकडे  आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कामाचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व 43 हजार गावांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवं असे आदेशही एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. जे पक्षाचं काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असेही संकेत शिंदेंनी दिल्याची  माहिती सूत्रांनी दिली.

ही बातमी वाचा:

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget