Gadchiroli News : क्या हुआ तेरा वादा...! गडचिरोलीत पुन्हा एकदा लेक विरुद्ध बाप, भाग्यश्री अत्रामांचं धर्मरावबाबांविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?
Gadchiroli News : निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या भाग्यश्री अत्राम यांनी त्यांचे वडील व स्थानिक आमदार धर्मरावबाबा अत्राम यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा अत्राम विरुद्ध अत्राम असे चित्र उभे ठाकले आहे. जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Faction) नेत्या भाग्यश्री अत्राम (Bhagyashree Atram) यांनी वडील व स्थानिक आमदार धर्मरावबाबा अत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या विरोधात त्यांच्याच क्षेत्रात आंदोलन सुरू केले आहे.
महायुती सरकारने (Mahayuti Government) जाहीरनाम्यात (Manifesto) दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने अहेरी तालुक्यातील आलापल्लीत त्यांनी सोमवारपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. 'क्या हुआ तेरा वादा' अशा शीर्षकाने केलेल्या आंदोलनामुळे धर्मरावबाबा अत्राम यांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. महायुती सरकारने निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, शेतकरी कर्जमाफी, अखंडित वीज ,धानाला बोनस ,रस्ते, एसटी बस सेवा यासह या क्षेत्रातील अन्न-वस्त्र-निवारा या प्रमुख मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत दिलेल्या आश्वासनातील 25 मुद्दे पूर्ण न केल्याचा आरोप करत भाग्यश्री अत्राम यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे.
समाधानकारक उत्तर मिळणार नाही, तोपर्यंत...
भाग्यशी अत्राम म्हणाल्या की, आजपासून आम्ही शासनाच्या विरोधात या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत. यात सर्व पाच तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी माझ्यासोबत उपोषणाला बसलेले आहेत. सरकारकडून जोपर्यंत ठोस निर्णय किंवा आश्वासन आम्हाला मिळत नाही. तोपर्यंत आम्ही येथे आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सरकार जनतेला विसरून गेले
लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने सरकार निवडून आले. निवडून आल्यानंतर सरकार जनतेला विसरून गेलेले आहे. जनतेच्या मूलभूत सुविधा देखील सरकार विसरून गेले आहे. महायुती सरकारने निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, शेतकरी कर्जमाफी, अखंडित वीज ,धानाला बोनस ,रस्ते, एसटी बस सेवा यासह या क्षेत्रातील अन्न-वस्त्र-निवारा या प्रमुख मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने आम्ही आंदोलन करत आहोत, असेही भाग्यश्री अत्राम यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























