बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतात फिल्डिंग लावली, अन् बिबट्याचा थेट वन कर्मचाऱ्यावर हल्ला, रेस्क्यूचा थरार मोबाईलमध्ये कैद
Leopard Attack : भंडाऱ्याच्या लाखनी वनपरिक्षेत्रातून एक अत्यंत थरारक बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर बिबट्यानं थेट हल्ला चढवलाय.

Bhandara Leopard Attack : भंडाऱ्याच्या लाखनी वनपरिक्षेत्रातून एक अत्यंत थरारक बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर बिबट्यानं (Bhandara Leopard Attack) थेट हल्ला चढवलाय. हा हल्ला इतका भीषण होता की, उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, मृत्यू समोर दिसत असतानाही वन कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळं एक मोठा अनर्थ टळला असून हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे.
हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नान्होरी-दिघोरी शेतशिवारात घडला. मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यानं शेतीची कामं प्रभावित झाली होती. वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतात 'फिल्डिंग' लावली होती. अशातच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक कर्मचाऱ्यांच्या दिशेनं झेप घेतली. बिबट्या समोरून वेगानं अंगावर येत असताना वन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखलं. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी हातात असलेल्या बॅरिकेट्सचा ढाल म्हणून वापर केला.
Leopard Attack : वन कर्मचाऱ्यांनं अचूक निशाणा साधत बिबट्याला 'डॉट' मारला अन्...
बिबट्या बॅरिकेट्सवर वार करत असतानाच, दुसऱ्या बाजूनं वन कर्मचाऱ्यांनं अचूक निशाणा साधत बिबट्याला 'डॉट' मारला. काही वेळातचं बिबट्या बेशुद्ध झाला आणि वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या थरारक रेस्क्यूनंतर बिबट्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं. वन कर्मचाऱ्यांच्या या 'रिअल लाईफ' हिरोईझममुळं शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पण या घटनेनं वन्यजीव आणि मानवी संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Umred Karhandla Wildlife Sanctuary: उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात 'टी-20 शॅडो' आणि बछड्यांचा मायेचा सोहळा
व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातून एक अतिशय मनमोहक दृश्य समोर आले आहे. येथील प्रसिद्ध वाघीण 'टी-20 शॅडो' आणि तिच्या बछड्यांमधील प्रेमाचा एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात टिपलेला हा क्षण पाहून वन्यजीव प्रेमी भारावून गेले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये 'शॅडो' आपल्या बछड्यांसोबत रमत असताना दिसतेय. वाघीण आणि तिच्या बछड्यांमधील हा 'मदर-चाइल्ड बाँडिंग'चा क्षण निसर्गाच्या सावळ्या रूपाचे दर्शन घडवतो. कधी बछडे आईच्या अंगावर बागडताना दिसतात, तर कधी शॅडो त्यांना मायेने चाटताना दिसते. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने ही एक अतिशय सकारात्मक बातमी मानली जात आहे. या अभयारण्यात वाघांचे दर्शन सहज होत असल्याने पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, शॅडो आणि तिच्या बछड्यांच्या या ताज्या व्हिडिओमुळे पर्यटकांमध्ये अधिकच उत्साह संचारला आहे.
























