एक्स्प्लोर
...म्हणून वाशिममधील शेतकऱ्यांकडून पिकांचा अंत्यविधी!

वाशिम : वाशिममध्ये फळबाग योजनेचा पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अंत्यविधीच्या रितसर पत्रिका वाटून हा अंत्यविधी करण्यात आला. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील दुबळवेल गावात काही शेतकऱ्यांनी मिळून किन्हीराजा मंडळ स्थापन केलं होतं. याअंतर्गत लावलेल्या फळबागेचं अस्मानीमुळे नुकसान झालं. मात्र सरकारदरबारी खेटे मारुनही दप्तर दिरंगाईमुळे या त्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतात मोठ्या कष्टाने जगविलेली फळबाग उद्ध्वस्त झाली. पाण्याअभावी झाडे तर जळालीच, दुसरीकडे त्याचा पीक विमाही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील झाडे जाळून निषेध करण्याचा निर्णय घेतला. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा























