एक्स्प्लोर
हलक्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
आज मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहील. या भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : राज्यातलं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या रिमझिम पावसाचा राज्यातल्या अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढचे 2 दिवस हे वातावरण असंच राहील असं भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर घातली आहे. कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात गहू आणि द्राक्ष पिकाचं नुकसान होणार आहे. आज मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहील. या भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे.
आणखी वाचा























