Nagpur Heat : गेल्या चार दिवसात नागपुरात उष्माघाताचे आठ मृत्यू, सर्व मृत हे बेघर आणि भिक्षेकरी
Nagpur Heat Wave News : नागपुरात गेले काही दिवस सातत्याने तापमान 45 अंशांच्या जवळपास आहे. त्यामुळे रस्त्यावर राहणारे बेघर आणि भिक्षेकरी यांची मोठी अडचण झाल्याचं दिसून येतंय.
![Nagpur Heat : गेल्या चार दिवसात नागपुरात उष्माघाताचे आठ मृत्यू, सर्व मृत हे बेघर आणि भिक्षेकरी Eight deaths due to heatstroke in Nagpur in last four days all dead homeless and beggars heat wave temperature marathi news update Nagpur Heat : गेल्या चार दिवसात नागपुरात उष्माघाताचे आठ मृत्यू, सर्व मृत हे बेघर आणि भिक्षेकरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/e28e6e23fc95be38ff019ec1dd4ed1471716893700119322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : गेल्या चार दिवसात नागपुरात उष्माघाताचे (Nagpur Heat News) आठ संशयित मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अजून या आठही मृत्यूच्या घटनांना त्या उष्माघाताने मृत्यू आहे असा दुजोरा आरोग्य विभागाकडून किंवा मनपाकडून मिळालेला नसला, तरी सर्व आठही जण रस्त्यावर राहणारे भिक्षेकरी किंवा बेघर होते आणि त्यांचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहे. त्यामुळे त्यांचे मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
1) सोमवारी कमाल चौका जवळच्या शनिचर बाजारामध्ये एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता. उन्हामुळे चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला होता आणि त्यानंतरच त्याचा मृत्यू झाला.
2) मंगळवारी सीताबर्डी परिसरातील लोखंडी पुलाजवळ एक 45 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला.
3) मंगळवारीच पाचपावली परिसरातील यशोदीप कॉलनी जवळ रात्री साडेदहा वाजता सुमारे 50 वर्ष वयाचा एक पुरुष मृतावस्थेत आढळून आला.
4) तर मंगळवारी कळमना मार्केट जवळच्या शिवम हॉटेल जवळ एक 50 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. परिसरातील लोकांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
5) मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सदर पोलीस स्टेशन अंतर्गत मेश्राम चौका जवळच्या फूटपाथवर 60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला.
6) बुधवारी दिघोरी उड्डाणपूल याच्याखाली सकाळी साडे सहा वाजता च्या सुमारास 31 वर्षीय युवक मृतावस्थेत आढळून आला.
7) धंतोली परिसरातील मेहाडिया भवनजवळ सकाळी दहा वाजता एक 50 वर्षीय व्यक्ती मृत आढळून आला.
8) काल म्हणजेच 29 मे रोजी सकाळी साडेआठ वाजता शताब्दी चौक जवळच्या फायर ब्रिगेड ऑफिसच्या भिंतीलगत 45 वर्षीय व्यक्ती मृत आढळून आला.
या सर्व मृत्यू प्रकरणासंदर्भात अजूनही आरोग्य विभाग किंवा महापालिकेने त्यांचे मृत्यू उष्माघातानेच झाले आहेत असा दुजोरा दिलेला नाही.
नागपुरात गेले काही दिवस सातत्याने तापमान 45 अंशांच्या जवळपास आहे. त्यामुळे रस्त्यावर राहणारे बेघर आणि भिक्षेकरी यांची मोठी अडचण झाल्याचं दिसून येतंय.
दिल्लीत रेकॉर्डब्रेक तापमान
सध्या दिल्लीचं तापमान वाढताना दिसतंय. राजधानी दिल्लीत 49.9 अंश सेल्सिअस तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. विशेष म्हणजे दिल्लीतील तापमान हे सरासरीपेक्षा तब्बल 9 अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. तर राजस्थानच्या चुरू आणि हरियाणातील सिरसामध्ये पारा 50 च्या पुढे गेलाय. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशानाच्या वतीनं करण्यात आलंय.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)