एक्स्प्लोर

Dhule News : मांजर समजून घरी आणली बिबट्याची पिल्लं! मादी बिबट्यानं घेतला सुगावा, अन् पुढे जे घडलं...

Dhule News : मांजरीची पिल्ले समजून शेतातून बिबट्याची पिल्ले घरी आणल्याची घटना धुळे तालुक्यातील नाणेसीताने येथे घडली आहे.

Dhule Leopard News : मांजरीची पिल्ले समजून शेतकऱ्याने बिबट्याची पिल्ले घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे तालुक्यातील नाणे सिताने या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतार काम करताना मजुरांना दोन पिल्ले दिसली. गोंडस मांजरीच्या पिल्लांसोबत मुलांचं मन रमलं त्यामुळे मजुरांनी ही पिल्ले  शेतातून घरी आणली. पण, ही पिल्ले मांजराची नसून बिबट्याची असल्याचं समजताच त्यांना धक्का बसला.

मांजरीची पिल्ले समजून घरी आणली बिबट्याची पिल्लं

दरम्यान, ही बाब लक्षात येताच ज्या ठिकाणाहून ही पिले आणण्यात आली होती, त्याच ठिकाणी त्यांना सोडलं. जंगलात सापडलेल्या जागी पिल्लांना ठेवल्यानंतर पिल्लांच्या आईने मुलांसह रात्री हे ठिकाण सोडल्याचा प्रकार वनविभागाच्या कॅमेरात कैद झाला आहे. 

बिबट्याची पिल्लांसोबत खेळली मजुरांची मुलं

धुळे तालुक्यातील नाणे सिताने येथील शेतकरी काशिनाथ माळी यांच्या शेतातील मजुरांना दोन पिले आढळून आली. या पिलांना घेऊन ते काशिनाथ माळी यांच्या शेतातील शेडमध्ये घेऊन आले. या पिलांबरोबर या मजुरांची मुले काही वेळ खेळली. मात्र, शेतमालक काशिनाथ माळी हे सकाळी शेतात आल्यानंतर त्यांना ही बिबट्याची पिले असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत वनविभागाला तात्काळ कळविलं.

पुढे काय झालं?

वनविभागाने ही पिल्ले ज्या ठिकाणाहून आणली हो,ती त्याच ठिकाणी ठेवल्यानंतर या ठिकाणी बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा लावण्यात आला. रात्रीच्या सुमारास एक मादी बछड्यांजवळ आली. या मादीने आजूबाजूची चाहूल घेत ती पसार झाली. यानंतर पुन्हा पहाटे दोन वाजेच्या सुमारास ती बछड्याजवळ येऊन त्यांना घेऊन जंगलात घेऊन पसार झाल्याची घटना वनविभागाच्या कॅमेरात कैद झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nashik News : 'कुटुंब घरात, मुलगा दारात', पणती लावताना बिबट्याने झडप घातली,  दिंडोरीत आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू  

महत्त्वाच्या बातम्या

Dhule: दुष्काळातही फायनान्स कंपन्यांची शिरजोरी; अवघ्या सोळाशे रुपयांसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ; हृदयविकाराचा झटका येऊन व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू
दुष्काळातही फायनान्स कंपन्यांची शिरजोरी; अवघ्या सोळाशे रुपयांसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ; हृदयविकाराचा झटका येऊन धुळ्यातील व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू
फक्त एक हजार रुपयात मन घातलं, तलाठ्याला रंगेहात पकडलं, धुळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई 
फक्त एक हजार रुपयात मन घातलं, तलाठ्याला रंगेहात पकडलं, धुळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई 
Dhule News: तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Embed widget