फक्त एक हजार रुपयात मन घातलं, तलाठ्याला रंगेहात पकडलं, धुळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मुलाचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या धुळे तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
Dhule News : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मुलाचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या धुळे तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. विक्रमसिंग भगवानसिंग गोठवाळ (वय 33, ग्राम महसूल अधिकारी, धुळे ग्रामीण) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तलाठ्याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने धुळे तालुक्यातील काळखेडे येथील शेतजमीन आपल्या मुलाच्या नावाने खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मुलाचे नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठी विक्रम गोठवाळ यांची भेट घेतली होती. यावेळी संबंधित काम करून देण्यासाठी तलाठ्याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने 16 नोव्हेंबर 2026 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर पथकाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता तलाठ्याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, सातबारा उताऱ्यावर मुलाचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडलं आहे. फक्त एक हजार रुपयांच्या लाच मागितल्यामुळं कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल
दरम्यान आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी तलाठी विक्रम गोठवाळ याने तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
जामनेरमध्ये आरटीओ विभागाच्या कारवाईदरम्यान धक्कादायक प्रकार समोर
Before You Go
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला





















