एक्स्प्लोर

Nashik News : 'कुटुंब घरात, मुलगा दारात', पणती लावताना बिबट्याने झडप घातली,  दिंडोरीत आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू  

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात ऐन दिवाळीत दिंडोरी तालुक्यातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात ऐन दिवाळीत (Diwali) हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) आठ वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. हा मुलगा घराच्या ओट्यावर दिवाळीनिमित्त पणती लावत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

नाशिकसह जिल्ह्यात (Nashik leopard) बिबट्याची दहशत कायम असून कालच पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला केला होता. यात मेंढपाळ जखमी झाला होता. या घटनेचा तपास सुरूच होता की सायंकाळी साडे सातच्या सुमारास (Dindori) तालुक्यातील निळवंडी येथील एक आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत बिबट्याने मुलाला परिसरातील उसाच्या शेतात नेत हल्ला चढविला. यात मुलाचा मृत्यू झाला आहे.  दिवाळी सण सुरु असून हा मुलगा घराच्या दारातच पणती लावत असताना बिबट्याने हल्ला चढविला. घरच्यांना काही कळायच्या आत बिबट्याने मुलाला उसाच्या शेतात नेले. गुरु खंडू गवारी असे या मुलाचे नाव आहे. 

दरम्यान, गेल्या एका वर्षातील ही दुसरी घटना असून मागील घटनेतही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्यालाही जीव गमवावा लागला. दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे हे घटनास्थळी दाखल होऊन मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले. दिंडोरी शहरासह निळवंडी, हातनोरे, वाघाड, जांबुटके, मडकीजांब परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

मेंढपाळावर बिबट्याचा हल्ला 

दरम्यान काल पहाटेच्या सुमारास दिंडोरी शहरात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. दिंडोरी शहरातील जाधव वस्तीवरील प्रकाश लक्ष्मण जाधव यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये मेंढपाळ आबा ठेलारी यांनी मेंढ्या बसविलेल्या होत्या. ठेलारी कुटुंब झोपल्यानंतर पहाटे 3 वाजेच्या सुमारास मेंढ्यांच्या दिशेने बिबट्या येऊन त्याने मेंढपाळ आबा ठेलारी यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. प्रकाश जाधव यांना ठेलारी यांचा आवाज आल्याने ते घटनास्थळी गेले असता ठेलारी यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Embed widget