एक्स्प्लोर

Tanaji Sawant: 'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी, धाराशिवमध्ये खळबळ

Tanaji Sawant: धाराशिवमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Tanaji Sawant धाराशिव: धाराशिवमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या दोन पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. तुमचा ही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व  तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणाऱ्या एका  ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटामध्ये 100 रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली. तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी हे बंद पाकीट दिले. टपाल असल्याचे सांगत बंद पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितले. या धमकीच्या चिठ्ठीमध्ये तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असं लिहिण्यात आलं होतं.

पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल-

सदर प्रकरणानंतर तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनिल लगडे,संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. आता ढोकी पोलीसांकडुंन घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

धाराशिव जिल्ह्याला मंत्रि‍पदाने दिली हुलकावणी-

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शिंदे सरकारमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला. तसेच माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते राणाजगजीतसिंह पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचाही नंबर लागला नाही. त्यामुळे धाराशिव जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. शिंदे सरकारमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. आता धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदेंनी शब्द फिरवला, सावंत समर्थक नाराज

विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान परंडा येथील मतदारसंघात घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना 'तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो' अशी घोषणा केली होती. आता शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे त्यांच्या समर्थकानी परांडा इथं आक्रमक होत घोषणाबाजी केली. 

संबंधित बातमी:

नागपूरहून काल बॅग घेऊन निघाले, तानाजी सावंत कुठे गेले?, नाराजीच्या चर्चांवरही मोठी माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv News: नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घालावं; नरेंद्र पाटलांनी सांगितलं प्रमाणपत्राबाबत नेमकं काय घडतंय
मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घालावं; नरेंद्र पाटलांनी सांगितलं प्रमाणपत्राबाबत नेमकं काय घडतंय
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget