बँक खाते अपडेट करायचे म्हणून घातला गंडा, दूध डेअरी चालकाची 24 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका दूध डेअरी चालकाची (Milk Dairy operator) लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online fraud) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Dharashiv : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका दूध डेअरी चालकाची (Milk Dairy operator) लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online fraud) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तानाजी दत्तु भोसले असं ऑनलाईन फसवणूक झालेल्या दूध डेअरी चालकाचं नाव आहे. 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेमकी कशी झाली फसवणूक?
दूध डेअरी चालक तानाजी दत्तु भोसले यांना व्हाट्सऍप फाईल पाठवण्यात आली. त्यानंतर ती फाईल डॉउनलोड केली व दूध संस्थेच्या खात्यातील पैसे लुटण्यात आले. भोसले यांच्या मोबाईलवर बॅकेतून बोलत आहे असे सांगून तुमचे आय. सी. आय. बँक खाते आपडेट करायचे आहे असा बनाव करुन आधार कार्ड व पॅन कार्डची माहिती घेण्यात आली. तसेच व्हॉटसअपवर आय डी बी आय बँक एक फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास लावले. यानंतर येडेश्वरी दुध डेअरीचे आयसीआयसीआय बँक खात्यातून 24 लाख 47 हजार 557 रुपये ऑनलाईन फसवणूक करुन काढनू घेण्यात आले. याबाबतची तक्रार तानाजी भोसले यांनी 2 एप्रिल रोजी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4),सह कलम 66(सी), 66(डी) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पण दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले पैसे द्याचे कसे?
दरम्यान, फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तानाजी भोसले यांनी तातडीने धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले दुधाचे पेमेंट द्यायचं कसं? हा प्रश्न आता ऑनलाइन फसवणुकीमुळे चेअरमन भोसले यांच्यापुढे पुढे निर्माण झाला आहे. या घटनेमुळं दूध उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्रास मोबाईलवरुनच फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. विविध कारणं सांगून नागरिकांना विश्वासात घेतलं जातं. त्यानंतर त्यांच्याकडून बँकेच्या खात्यासंदर्भात माहिती घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्ह्यांची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान, असा गुन्ह्यात फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या:























