एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Santosh Deshmukh Case : देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जावा. वर्ष-दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केली. तर जोपर्यंत संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे, असे वचन त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा (Dharashiv Jan Akrosh Morcha) काढण्यात आला. या मोर्चाच्या सभेतून ते बोलत होते. 

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन तरुणांच्या महाराष्ट्रात हत्या झाल्या. त्याच्या निषेधार्थ आणि या कुटुंबांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने आक्रोश मोर्चा आज धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलाय. ही घटना घडल्यानंतर मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. दीदी आणि तिच्या लहान भावाला मी बघितलं. मला स्वतःची आठवण झाली. आपण आज न्याय मागण्यासाठी येत आहोत. पण, आपण स्वतः माणसं आहोत. आपल्यालाही मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्यासाठी आपण जगत असतो. त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो. मुलीला वडिलांचा आधार असतो. नुसते वडील आहेत म्हटलं तरी शंभर हत्तीचा बळ त्या लेकराच्या हातात असतं. वडिलांना वाटतं की मी माझ्या मुलाचा संभाळ करेल, त्याला मोठं करेल. ज्या क्षणाला संतोष देशमुख यांना जीवघेणी मारहाण होत होती, ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील? माझ्या पाठीमागे माझ्या लेकरांचं कोण रक्षण करेल? असा विचार त्यांच्या मनात आला नसेल का? ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली, हे बघितल्यानंतर माणूस म्हणून या गोष्टीचा राग येतो का नाही? या गोष्टीची चिड येते की नाही?  असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा

ओमराजे निंबाळकर पुढे म्हणाले की, अशा पद्धतीच्या वृत्तीला तातडीने कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्यांना फाशीपेक्षा दुसरी कुठलीच शिक्षा असू शकत नाही, अशी माणसं समाज व्यवस्थेत जगायच्या लायक नाहीत, त्यांना तातडीने फासावर लटकवण्याचे काम सरकारचे आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे, असे वचन त्यांनी यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले. 3 जून 2006 ला माझ्या वडिलांची हत्या झाली, आज अठरा वर्ष झालेत, अजूनही प्रकरण ट्रायल कोर्टात आहे. सुरेश आण्णा माझी तुम्हाला विनंती आहे, या वृत्तीला जर धडा शिकवायचा असेल, या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टाकडे चालवला जावा. वर्ष-दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे. आज कुठल्याही समाजाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातो. ही जात नसते तर वृत्ती असते. याचे काय कारण आहे? त्यांना वाटत असतं मी पदावर आलो, आमदार, मंत्री झालो, माझ्या पक्षाचे सरकार तिथे आले आहे. दोन-तीन टर्म झाल्यावर त्या माणसाला मस्ती चढते, त्यांना वाटतं की सगळंच आपल्या हातात आहे. दोन-तीन खून केले तरी आम्ही पचवू शकतो. त्यामुळे त्या माणसाला आत्मविश्वास येतो आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडतात. हा आत्मविश्वास जो माणूस देत आहे, या वृत्तीचा नायनाट करणे गरजेचे आहे. ही वृत्ती कुठल्याही समाजात असेल, तरी त्याच ठिकाणी ठेचून माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतून संपवणे गरजेचे आहे, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Embed widget