एक्स्प्लोर

95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ

तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.

धाराशिव : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या कारवाईने जोर धरला असून अनेक बडे मासे जाळ्यात अडकत आहेत. विशेषत: महसूल खात्यात तहसिलदार, तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. आता, पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत (bribe) प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपींवर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव (Dharashiv) ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. 

2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंति 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. त्यात, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातही लाचलुचपत विभागाने थेट कारवाई करत तलाठ्याला रंगेहात अटक केली होती. 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व महसूल सहाय्यक असं दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तलाठी रावसाहेब काकडे व महसूल सहाय्यक मनोज झिने अशी लाचखोरांची नावे असून यातील तलाठी रावसाहेब काकडे याची सेवानिवृत्ती अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, पोलिसांनी रंगेहात धाड टाकत तलाठी महोदयांना अटक केली असून लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, शासकीय सेवेतील इतर भत्ते आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यापासून हे महाशय वंचित राहू शकतात. 

हेही वाचा

मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळला जामीन, 66 दिवसानंतर सुटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
Embed widget