एक्स्प्लोर

तीन पक्षाचे सरकार त्यांच्या वजनाने पडेल, त्या दिवशी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल : देवेंद्र फडणवीस

कारवाईच्या भीतीमुळे संजय राऊत बोलत असल्याचे सांगताना जर चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केल्यावर कोर्ट सोडेल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पंढरपूर : राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार असून यानंतर भाजप लगेच स्वबळावर सत्ता स्थापन करेल. यासाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंढरपूर येथे पदवीधर उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला दिवंगत जेष्ठ आमदार सुधाकर परिचारक यांचे घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आणि नंतर भगताचार्य कै वा ना उत्पात यांचे घरी भेट दिली. यानंतर कार्तिकी यात्रेच्या तोंडावर मंदिरात न जाता नामदेव पायरी जवळूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, खासदार रणजित निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते. असले सरकार चालत नसते, आम्हाला कोणतीही घाई नाही वाट बघा असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. संजय राऊत यांच्याकडून ईडी प्रकरणातील कारवाईनंतर होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना संजय राऊत यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर आम्हाला बोलता येते, मात्र आमची ती संस्कृती नाही. ते वापरतात त्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो असं फडणवीस यांनी म्हटलं. असे शब्द केवळ होत असलेल्या कारवाईच्या भीतीमुळे संजय राऊत बोलत असल्याचे सांगताना जर चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केल्यावर कोर्ट सोडेल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत काय होते ते अर्णब गोस्वामी यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराची एकही केस दाखवा असे आव्हान देताना गैरवापर केला असता तर परिस्थितीच वेगळी दिसली असती. पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री कधीही या संस्थांच्या कामात हस्तक्षेप करत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले . संजय राऊत देत असलेल्या फालतू धमक्यांना आम्ही भीक नाही घालत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

सध्या संजय राऊत यांना बिहार दिसू लागले असून सत्तेत आल्यावर शिवसेना व संजय राऊत कसे बदलत गेले हे लव्ह जिहाद प्रकरणावरून दिसतंय. 2014 मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी बसणाऱ्या जोडप्याने मारहाण करणारी शिवसेना आता लव्ह जिहादबाबत अग्रलेख लिहितंय हे पाहून गंमत वाटते, असा टोलाही फडणवीसांनी संजय राऊत आणि शिवसेनेला लगावला .

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 : एका सामन्यात 10 विक्रम, शाई होप-संजू सॅमसनचा जलवा! टी-20 क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?
एका सामन्यात 10 विक्रम, शाई होप-संजू सॅमसनचा जलवा! टी-20 क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
Embed widget