(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महायुतीच्या जागावाटपावर दादा भुसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "ज्या जागा शिवसेनेने लढवल्या त्या..."
Dada Bhuse : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जागावाटपावर मोठा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तरही दिले आहे.
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2024) येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपावरून चर्चा होत आहे. भाजपने (BJP) नुकतीच आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचे नावे नसल्याने विरोधकांनी भाजपला टार्गेट केले आहे.
तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रातील जागांवर दावे केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीचा तिढा अद्याप कायम आहे. आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जागावाटपावर मोठा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ज्या जागा शिवसेनेने लढवल्या, त्या जागांवर आमचा दावा - दादा भुसे
दादा भुसे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना जागा वाटपावर मोठं वक्त्यव्य केले आहे. ते म्हणाले की, ज्या जागा गेल्या वेळी शिवसेनेने (Shiv Sena) लढवल्या होत्या. त्या जागांवर आमचा दावा आहे. आज दिल्लीत जागावाटपासंदर्भात महायुतीची बैठक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या जागांबाबतचा तिढा सुटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दादा भूसेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, शाह तुमचा यावर अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावर दादा भुसे यांना विचारले असता ते म्हणाले की, हिंदूह्रदयसम्राट हा जनतेने बाळासाहेबांना दिलेला मान आहे. त्यांना मर्यादित करणं योग्य नाही. बाळासाहेब ही राष्ट्रीय संपत्ती आहे ती एका कुटुंबाची नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
यात्रांना सामान्य नागरिक थारा देत नाहीत
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही पुढील आठवड्यात नाशिकमध्ये येत आहे. ते चांदवडला शेतकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यावर दादा भुसे म्हणाले की, राहुल गांधींना शुभेच्छा, निवडणुका लागल्या की या यात्रा निघता. 80 टक्के समाजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. यात्रांना सामान्य नागरिक थारा देत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या