Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर, म्हणाले..
Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये या तुम्हाला निवडून आणतो, अशी खुली ऑफर दिली होती.
Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये या तुम्हाला निवडून आणतो, अशी खुली ऑफर दिली होती. ठाकरेंच्या या ऑफरला मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आता थेट उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ऑफर दिली आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?
उद्धव ठाकरेंना ऑफर देताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, "त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देतो. भाजपात या, तुम्हाला निवडून आणू आणि सन्मानाचं पद देऊ. मी आत्महत्या करेन पण भाजप सोडणार नाही, असं गडकरी यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अशा प्रकारची विधान करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर त्यांनी विचार करावा. गडकरी राष्ट्रीय संपत्ती आहेत. सर्वपक्षीय नेते त्यांचं कौतुक करतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तसं करू नये".
पुढे बोलताना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, निवडणूक होईल, घाई कशाची आहे? आपल्याकडे देखील निवडणूक बाकी आहे. अशी विधाने करुण आमच्यासाठी सत्ता हेच सर्वतोपरी आहे हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलय. अगोदर त्यांनी 'मविआ'त सर्वात जास्त जागा कोण लढवले हे ठरवावे, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना केले.
मुख्यमंत्री शिंदेंनी हुकूमशाही संपवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचा आशीर्वाद घेऊन उद्धव ठाकरेंची हुकूमशाही संपवली आहे. शिंदेंनी उठाव केला नसता तर ठाकरेंचे सरकार इतिहास जमा झाले नसते. एखाद्या घोषणेचा एक मुहूर्त असतो. अशी पद्धत 1952 पासून आहे. आम्ही सूट कमी दिली असेल तर कर्नाटक सरकारने अधिक सूट द्यावी, असे आवाहन मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा योग्य सन्मान होईल
आमच्या मित्रांच्या मनात चुकीचा भाव निर्माण होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ. एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा योग्य सन्मान होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य सन्मान होईल. त्यांच्या मनात पश्चात्ताप होईल, असं काहीही आम्ही होऊ देणार नाही. कुणाला तिकीट मिळणार आणि कापणार हे केंद्रीय नेतृत्व ठरवेन. केंद्रीय नेतृत्व व्यवस्थित अभ्यास करून ठरवेल, असेही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या