संकट काळात विरोधी पक्ष सरकारच्या सोबत; केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले..
Congress on Operation Sindoor: देशावरील संकटाच्या काळात आम्हाला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांनी दिली आहे.

Congress on Operation Sindoor नवी दिल्ली: आम्ही सर्व विरोधी पक्षातील नेते या संकटाच्या काळात सरकार सोबत आहोत. देश हितासाठी सरकार जोही निर्णय घेईल आम्ही त्याला समर्थन देऊ. देशाच्या हितासाठी आम्हा सर्वांचे एकमत झाले आहे. देशावरील संकटाच्या काळात आम्हाला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांनी दिली आहे. केंद्र सरकारने दिल्ली येथे बोलवलेली सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीला सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत 'ऑपरेशन सिंदूर'वर (Operation Sindoor) सविस्तर चर्चा झाली. या बैठकीअंती भारतीय सैन्य आणि सरकार देशाच्या हितामध्ये जो निर्णय घेईल त्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा असेल असे मत काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी व्यक्त ककेलं आहे.
सर्वपक्षीय बैठकीत दीड तास ऑपरेशन सिंदूरवर चर्चा
प्रास्ताविक म्हणून किरेन रिजिजू यांनी माहिती दिली, त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संपूर्ण ऑपरेशन सिंदूर ची माहिती दिली. ऑपरेशन पचात नेमकी काय कारवाई केली जाईल आणि सध्या परिस्थिती काय याबद्दल सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन पुढी प्रक्रिया राबवणाची सरकारची मनीषा असल्याचे समोर आले आहे. अशातच काँग्रेसने आपली भूमिका मांडत आपण देश हितासाठी एकत्र असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानचा नापाक इरादा नेस्तनाबूत करण्यासाठी भारतातील सर्व राजकीय नेते एकवटल्याने भारताची ताकद यां लढ्यात अधिक वृद्धिंगत होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतातील राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण देश आमच्यासोबत आहे- किरण रिजिजू
सर्वपक्षीय बैठकीनंतर किरण रिजिजू यांनी प्रतिक्रिया दिली, यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देश आमच्यासोबत आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सर्व नेत्यांनी त्यांचे आणि पक्षाचे विचार मांडले. माझा असा विश्वास आहे की सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवली आहे. जेव्हा देश आव्हानात्मक परिस्थितीतून जात असतो, तेव्हा राजकारणाला स्थान नसते. आपल्या सैन्याने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण देश आमच्यासोबत आहे.
हे ही वाचा


















