एक्स्प्लोर

Manoj Jarange : गुन्हे मागे घेऊ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आता खोटं बोलू नयेत; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

Manoj Jarange : फडणवीस यांनी सांगितले होते की, आंतरवाली सराटीतील तुमच्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ. सोबतच, महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेऊ. त्यामुळे, यापासून फडणवीसांनी मागे फिरू नये.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जे काही बोलले ते बरोबर आहे. कारण ते खोटं बोलत नाही. मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती करतो, त्यांनीही खोटं बोलू नये. कारण आंतरवाली सराटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचे देखील मंत्री आले होते. त्यावेळी, फडणवीस यांनी सांगितले होते की, आंतरवाली सराटीतील तुमच्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ. सोबतच, महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेऊ. त्यामुळे, यापासून फडणवीसांनी मागे फिरू नये. त्यांनी खरं बोलावं, त्या एकट्याचं (छगन भुजबळ) ऐकून आमच्यावर अन्याय करू नये. नसता मराठ्यांना नाविलाजाने आंदोलन करावे लागेल, असे मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहे. 

ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारे बाधा येऊ नये असं, राज्य मागासवर्ग आयोगाने करावं. त्यावर राज्य मागासवर्ग आयोगाने लक्ष द्यावे. या अगोदरच्या आयोगावर वेगवेगळे जातीचे वेगवेगळे लोकं होते. त्यावर आम्ही कधी प्रश्न उपस्थित केले का?, समितीचा अध्यक्ष ओबीसी असला तर ओबीसीचा आयोग असतो असं असतं का?, ते गरीब जनतेला न्याय देण्यासाठी कायद्याने बसवलेला आहे. ते न्यायाची प्रक्रिया पार पाडत असतात, त्यांना जात नसते, असे मनोज जरांगे म्हणाले. मात्र, आयोगाचे अध्यक्ष ओबीसी असल्यास तुम्हाला गोड लागतं. या आयोगावर आता कोण आलं हे मला माहीत नाही, पण आयोगात जाती का आणल्या जात आहे हे मला कळत नाही, असेही जरांगे म्हणाले. 

मागासवर्ग आयोगाच्या राजीनामा सत्रवर प्रतिक्रिया...

आयोगात जात पाहणे हे सर्व खालच्या दर्जाचे विचार आहेत. कशातही जात बघतात, हा रोग चांगला नाही. यांनी आता न्यायाधीशांची जात बघू नये. या अगोदर महापुरुषांची बघितली. न्यायमंदिरावरही यांनी भविष्यात जातीवर संशय घेऊ नये. हा माणूस देशाला, राज्याला कलंक आहे. सर्वसामान्य लोक एकमेकांच्या सुखदुखात जातात, एवढे लोकांमध्ये प्रेम आहे. मात्र, याच्यामुळे लोकांमध्ये वातावरण खराब होत आहे. यांची अशी इच्छा आहे का? लोकांनी एकमेकांना मदत करू नये. धनगर बांधव, मराठा बांधव एकमेकांच्या अडचणीत उभे राहतात, मात्र त्यांच्यात नाराजी पसरवण्याचे काम सुरू असल्याचं म्हणते जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. 

भुजबळांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे...

मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्याचे (छगन भुजबळ) ऐकून आमच्या समाजावर अन्याय करू नका. कारण आमच्या नोंदी शासकीय आणि अधिकृत सापडल्या आहेत. त्यामुळे, अन्याय करू नये. बाकी कोणत्या ओबीसी नेत्यांना आम्ही नाव ठेवणार नाही. कारण त्यांचे आणि आमचे गाव पातळीवर चांगले संबंध आहे. हा एकच आहे जो बोलत आहे. यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे नेते आंतरवालीत आले होते. त्यांचे ऐकून आम्ही मान ठेवला, त्यामुळे आता त्यांनी आमचाही मान ठेवावा, असे जरांगे म्हणाले. 

नितेश राणे यांच्यावर दबाव असेल...

नितेश राणे यांच्याकडून जरांगे यांच्यावर होत असलेल्या आरोपावर देखील जरांगे यांनी उत्तर दिले आहे. "उपोषण सुटले त्यावेळेसच गाव बंदी उठवलेली आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर न बोललेलं बरं,  त्यांना अगोदरच दोन-तीन वेळेस सांगितलेला आहे. समाजासाठी तुमचं काम मोठ आहे. पण, समाजापेक्षा पक्ष मोठा मानायचा म्हणल्यावर त्यांना असं बोलावंच लागणार आहे. शेवटी त्यांच्यावर दबाव असणार आहे. त्यामुळे ते मराठ्यांच्या विषय बोलत असतील. मात्र, आमची विनंती आहे की,  मराठ्यांच्या लेकरांच्या विरोधात त्यांनी बोलू नये. जातीपेक्षा नेते मोठे नसतात,” असे जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

'हो, मनोज जरांगेंना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले'; मुख्यमंत्री शिंदेंची सभागृहात माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मोठी बातमी! आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार, धाराशिव जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी! आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार, धाराशिव जिल्ह्यात खळबळ
Nagpur Hit and Run Case: बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला
बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला
Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambernath Gas Leak : अंबरनाथ MIDC तील केमिकल कंपनीतील वायूगळतीवर नियंत्रणAjit Pawar : Nitesh Rane यांची जीभ घसरली; अजितदादा म्हणतात,वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मोठी बातमी! आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार, धाराशिव जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी! आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार, धाराशिव जिल्ह्यात खळबळ
Nagpur Hit and Run Case: बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला
बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला
Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
Chitrangda Singh Photos :  बाथटबमध्ये पोझ, डीपनेक ड्रेसमध्ये किलर अदा, पाहा चित्रांगदा सिंहचे कातिल फोटो
बाथटबमध्ये पोझ, डीपनेक ड्रेसमध्ये किलर अदा, पाहा चित्रांगदा सिंहचे कातिल फोटो
विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Pune News: विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
Yojanadoot : शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करा अन् दरमहा 10 हजार मिळवा, योजनादूतसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
योजनादूतला तुफान प्रतिसाद, 50 हजार जागांसाठी आतापर्यंत 1 लाख 20 हजार अर्ज, नोंदणी करण्याची शेवटची संधी
Embed widget