एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठवाड्यात 3 दिवसांत 6 आत्महत्या, मराठा आरक्षणावरून तरुण उचलतायत टोकाचे पाऊल

Maratha Reservation : धक्कादायक म्हणजे मराठवाड्यात मागील 3 दिवसांत 6 तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर मराठा तरुण आरक्षणाच्य मागणीवरून अधिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. मात्र, असे असतांना काही तरुण नैराश्यातून थेट आत्महत्या (Suicide) सारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. धक्कादायक म्हणजे मराठवाड्यात मागील 3 दिवसांत 6 तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. 

पहिली घटना...

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी असलेल्या मराठा तरूणाने आत्महत्या केली आहे. उपोषण सुरु असतांना मंडपातून उठून थेट घर गाठत दरवाजाच्या कोंड्याला दोरी लावून गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली. शिवाजी किसन माने आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सरकारला वेळ देऊनही मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण करू शकत नाही, या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. ही घटना आज गुरवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंतरवाली टेंभी गावात घडली. 

दुसरी घटना...

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तसेच. "जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका," असा मजकूर आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पाटीवर लिहून ठेवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (चार व सहा वर्षाची ) आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांना दोन एकर शेती असून या शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवत होते. दरम्यान, या घटनेनंतर गावकरी आक्रमक होतांना पाहायला मिळाले. तर, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आपतगाव फाट्यावर रास्ता रोको करून टायर देखील पेटवून देण्यात आले. 

तिसरी घटना...

मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे गुरुवारी सकाळी घडली. मयत युवकाचे नाव लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर असे आहे. आरक्षणासाठी सरकार वेळ लावत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूणांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे. या नैराश्यातूनच देवजना शिवारातील शेतामधील एका झाडाला लहू उर्फ कृष्णा कल्याणकर याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे, असा उल्लेख आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

चौथी घटना...

धाराशिव जिल्ह्यात गुरुवारी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी हा तिसरा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. डोमगाव येथील शेतकरी बळीराम देविदास साबळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साबळे घरातून शेतात जात असताना, 'आपल्याला काही आरक्षण मिळत नाही, मेल्यालं बरं', असे गावात बसल्यानंतर कांही ग्रामस्थांजवळ नैराश्येच्या भावनेतून बोलत होते. त्यानंतर दुपारी शेतात गेल्यावर एक वाजेच्या सुमारास त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. 

पाचवी घटना...

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सहावी घटना...

लातूर जिल्ह्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्यने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून तो मराठा आरक्षणावरून चिंतेत होता. त्यामुळे, "दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही," असा स्टेटस ठेवून या तरुणाने स्वतःच जीवन संपवलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महेश कदम असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : सरपंच असल्यापासून मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान, पण आता... पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी घेत स्वतःला संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय?

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget