Sanjay Shirsat : सामनामध्ये आता किडे, झुरळ पहायला मिळतात; शिरसाट यांची खोचक टीका
Sanjay Shirsat : सामनावरून शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.
Sanjay Shirsat on Saamana : शिवसेनेते झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोन्ही गटाकडून एकेमकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. अशातच सामना (Saamana) मुखपत्रातून शिंदे गटावर कडाडून टीका करण्यात येत आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या विरोधात बातम्या येत असल्याचा आरोपही होत आहे. तर याच सामनावरून शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. “सामनात आता किडे, झुरळ पहायला मिळत असल्याचा” टोला शिरसाट यांनी लगावला आहे. औरंगाबाद येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, सामनात आता किडे, झुरळ पहायला मिळतात. सामनात यापूर्वी कधी राहुल गाधींचे फोटो छापले जात नव्हते. मात्र, आता राहुल गांधी हे त्यांचे फ्रंट पेज झाले आहे. त्यामुळे सामना कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, हे आजच्या मुखपृष्ठवरून तुम्हाला दिसत असेल, असे संजय शिरसाट म्हणाले.
महाविकास आघाडीच्या बैठकीवर प्रतिकिया...
दरम्यान, यावेळी संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीवर देखील निशाणा साधला आहे. "विरोधकांच्या बैठकीत काय निष्पन्न होईल हे पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे चित्र दिसतंय. त्यामुळे आज बैठक झाल्यावर त्यांची दिशा सुद्धा आम्हाला कळेल असे शिरसाट म्हणाले.
राहुल गाधींवर प्रतिकिया...
राहुल गांधी यांना न्यालयाने पुन्हा एकदा खासदारकी बहाल केली असल्याने, यावर देखील शिरसाट यांनी प्रतिकिया दिली आहे."न्यायालयाचा निकाल तुमच्या विरोधात लागला की, तुम्ही म्हणता न्यायदेवतेवर आमचा विश्वास नाही. न्यायालय हे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले आहे. मात्र, आता तुमच्या बाजूने निकाल लागल्यावर तुम्ही जल्लोष करत आहात. अशा लोकांना न्यायालयाने दिलेले ही चपराक आहे. या देशात लोकशाही कोणीही विकत घेऊ शकत नाही, याचेही हे उदाहरण आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णयाचा सर्वांनी सन्मान करायला हवा, असे शिरसाट म्हणाले.
कोरोना काळातही यांची दुकानदारी सुरु होती...
मुंबईच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर सुद्धा शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. "कोविड मधील हा गंभीर प्रकरण आहे. कोवीडमध्ये अनेकांचे प्राण जात असताना, आपली दुकानदारी कशी चालेल याकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच आता पेडणेकर यांची चौकशी होत असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: