एक्स्प्लोर

संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात, महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाचे थकवले 40 कोटी

शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून 130  ते 135 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो.  या पाण्याचे बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते.

छत्रपती संभाजीनगर:  राज्यात उन्हाचा (Heat) चटका चांगलाच वाढत आहे. काही भागात तापमानाचा (temperature) पारा 40 अंशाच्या पुढे जात आहे. तर काही भागात अवकाळी पाऊसही (Rain) पडत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस राज्यातील पाणीसाठ्यात (water) मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तर दुसरीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो. महापालिकेने जलसंपदा विभागाचे 40 कोटी न भरल्याने त्यांनी नोटीस बजावली आहे. 

शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून 130  ते 135 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो.  या पाण्याचे बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते. मात्र  मागील काही वर्षांपासून मनपाने पैसे भरले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात जलसंपदा विभागाने 40 कोटींची थकबाकी भरावी म्हणून नोटीसही दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने काही तास पाणीपुरवठा थांबविला होता.

पाणीपट्टीपोटी मनपाचे 15 कोटी रुपये थकीत

जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे 15 कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम 40 कोटी केली, असे मनपातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी काही ठरावीक रक्कम मनपाकडून भरण्यात येते. व्याज आणि दंड मनपा भरू शकत नाही असेही अधिकारी सांगत आहे. 

मराठवाड्यात चिंताजनक स्थिती

राज्यात सध्या पाणी टंचाईच्या झळा लागत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या उन्हाबरोबर पाणी आणि चाराटंचाई वाढली आहे. अनेक धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होत आहे. राज्यातील प्रमुख 138 मोठ्या धरणांमध्ये सध्या 32 टक्केच पाणीासाठा राहिला आहे. यामध्ये मराठवाड्याची स्थिती चिंताजनक आहे. कारण मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 16 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळं तिथं पाणीटंचाईचं संकट गडद होताना दिसत आहे. 

पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वणवण

दरम्यान, पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वणवण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सध्या एप्रिल महिना सुरु आहे. पुढचा मे महिना पूर्ण उन्हाळा असणार आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. कारण जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. पाऊस लवकर पडला तर बरे नाहीतर लोकांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

CM Eknath Shinde: लंडन ते लखनौ, ठाकरेंची सर्व कागदपत्रे माझ्याकडे, मर्यादा पाळा अन्यथा सर्व बाहेर काढेन: एकनाथ शिंदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP MajhaEknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलंMahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget