एक्स्प्लोर

संभाजीनगरवरून महायुतीत रस्सीखेच सुरु असतानाच भाजप आमदार प्रशांत बंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार म्हणून संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. अशात भाजप आमदाराने मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) महायुतीत (Mahayuti) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने या मतदारसंघावर दावा केला जात आहे. अशात भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये संभाजीनगरच्या बाबतीत चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, आजच्या भेटीत कोणतेही राजकीय चर्चा झाली नसून, एका खाजगी कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री यांची भेट घेतली असल्याची माहिती प्रशांत बंब यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. 

महायुतीत संभाजीनगरचा तिढा कायम?

महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाकडे जाणार याचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. एकीकडे शिंदेसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जात असून, दुसरीकडे भाजपकडून देखील याच मतदारसंघावर हक्क दाखवला जात आहे. त्यामुळे संभाजीनगरचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर देखील संभाजीनगरच्या जागेचा वाद कायम आहे.

भुमरेंचा स्वतःचा मतदारसंघ जालना लोकसभेत...

महायुतीकडून संभाजीनगर लोकसभेतून निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या संदिपान भुमरे यांचा स्वतः पैठण विधानसभा मतदारसंघ (Paithan Assembly Constituency) जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) आहे. त्यामुळे भुमरे यांचा पैठणमधील मतदान त्यांना संभाजीनगरमधून मिळू शकणार नाही. तसेच अनेक लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेल्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर भुमरेंची ताकद कमी पडेल असे मत भाजपमधील काही नेत्यांचे असल्याची चर्चा आहे.

ठाकरे गटाकडून पुन्हा खैरे मैदानात...

महायुतीचा छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार अजूनही निश्चित नसल्याचे चित्र आहे, अशात दुसरीकडे महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरवले आहे. खैरे यांनी मागील काही दिवसांपासून प्रचाराला देखील सुरवात केली आहे. तर,  13 एप्रिल रोजी  खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय उदघाटन केले जाणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे. तसेच 22 एप्रिलरोजी खैरे यांचा नामांकन अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे हजर राहणार आहे. तसेच, 10 मे रोजी खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Shiv Sena Meeting : छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार कोण?, शिंदेसेनेची महत्वाची बैठक; 'या' नेत्यांची उपस्थिती

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget