एक्स्प्लोर

Pahalgam Attack: विमानं-रणगाडे पळवून नुसतं डिझेल जाळतायत, हे पहलगमचा बदला घेणार नाहीत, मनोज जरांगेंचा हल्ला

Pahalgam terror attack: पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कधीही युद्धाची ठिणगी पडेल, असे वातावरण आहे.

छत्रपती संभाजीनगर: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला हे सरकार  घेणार नाही. सध्या फक्त विमानं आणि रणगाडे पळताना दिसत आहेत. सरकार फक्त विमानाचे डिझेल नासवत आहे, अशी खरमरीत टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jaragne) यांनी केली. सरकारने जनतेच्या जीवाशी खेळता कामा नये. पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदाच प्रयोग केला होता, सगळा देश हा हादरून गेला होता, त्यांना सगळे भीत होते, यांना कोणीच भीत नाही. फक्त तिकडे पाण्याची आणीबाणी सुरू झाली म्हणून सांगतात तिकडे तर पाणी सन्नाट वाहत आहे. हे नुसते विमानाचे रणगाड्याचे, ट्रक मध्ये फौजी लोक बसवलेले, पळालेले  दाखवतात, पहिले व्हिडिओ आहेत की आत्ताचे आहेत याचा मेळ लागत नाही. नुसतं युद्धजन्य परिस्थिती दाखवतात. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तीच परिस्थिती असते. तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटते. मोदी सरकार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करताना दिसत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकार पाकिस्तानवर बॉम्ब टाकत नाही. बॉम्ब गोडाऊनमध्ये फक्त साठवून ठेवले आहेत. हे ट्रक खपाखप ट्रकमधून नेऊन पाकिस्तानवर टाकायला पाहिजेत, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.

Manoj Jarange Patil: मुंबईत मराठ्यांची शक्ती दिसणार: मनोज जरांगे पाटील

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती निमित्त सरकारने नियोजित कार्यक्रम (बैठक) निर्णय घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी आरक्षणाचा निर्णय देखील घ्यावा. ST मध्ये धनगर समाजाला आरक्षण  देण्याचे कामं देखील सरकारनं करावे. जातीयवादात सरकारने पडू नये. 
राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षण देऊन आरक्षण दिलं, आम्ही ते सर्व जातीच्या देण्याची मागणी केली होती,इतर सर्व बांधवांसाठी आम्ही लढलो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

धनगर बांधवांनी सांगितलं होतं की, आम्ही नियमाने त्यात आहोत, पुरावे आहेत. 29 तारखेला आरक्षणसाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. लेकरांचा फायदा व्हावा म्हणून मी करतोय, सर्वांनी ताकदीने मुंबईला यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. दोन दिवस कामं बुडवा पण या. जे  येऊ शकत नाहीत त्यांनी आम्हाला सोडायला यायचं तिथं येऊन आम्हाला आशीर्वाद द्या. ताकदीने मराठे येणार, मागच्यापेक्षा चार पट मराठे मुंबईत दिसणार, असा विश्वास यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणारा इम्तियाज मागरे आर्मीच्या तावडीतून सुटला, पाण्याच्या खळाळत्या प्रवाहात उडी टाकली अन्

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget