एक्स्प्लोर

'मी मंत्री सावेंचा पीए', मर्जीप्रमाणे गुन्हा दाखल करा, महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी; स्टेशन डायरीला नोंद

Chhatrapati Sambhajinagar : या सर्व घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले आहे.

छत्रपती संभाजीनगर : आपण एका मंत्र्याचे पीए असल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्याने मर्जीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात ही घटना समोर आली असून, संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याचा बिपी वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने स्टेशन डायरीला नोंद देखील घेतली आहे. तर, या सर्व घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले आहे. 

राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल यांच्या एका कार्यकर्त्याने आपण सावे यांचे पीए असल्याचे सांगत एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा प्रकार समोर आले आहे. आपण अतुल सावे यांचे पीए असून, मी सांगत असल्याप्रमाणे माझ्या मर्जीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी या कार्यकर्त्याने केली. तसेच, "तुम्ही तक्रार का घेत नाही, तुम्हाला बोलण्याची पध्दत आहे का?,  मी कोण आहे हे माहीती आहे का?, मी आमदार सावे यांचा पी.ए. आहे. तुमंची मी साहेबाकडे तक्रार करतो," असे म्हणत या कार्यकर्त्याने सावे यांच्या नावाचा वापर करून महिला अधिकाऱ्यावर दबाव टाकला. तसेच नांदेडकर असे त्याचे नाव असल्याची नोंद संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने स्टेशन डायरीला घेतली आहे. 

महिला अधिकारी रुग्णालयात दाखल...

मंत्री सावे यांच्या कार्यकर्त्याने मर्जीप्रमाणे गुन्हे दाखल करण्यास महिला अधिकाऱ्यावर दबाव आणला. तसेच मी मंत्री अतुल सावे यांचा पीए असून, तुमंची तक्रार साहेबांकडे करणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे, या महिला अधिकाऱ्याचा बीपी वाढल्याने रात्री त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कालपासून या घटनेची पोलीस दलात जोरदार चर्चा आहे.  

अतुल सावेंची प्रतिक्रिया...

एका महिला अधिकाऱ्याला देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात सावे यांचे नाव समोर आल्यावर 'एबीपी माझा'ने याबाबतीत सावे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावर बोलतांना सावे म्हणाले की, "संबंधित व्यक्ती हा माझा पीए नसून, फक्त कार्यकर्ता आहे. तसेच, पोलिसांना कोणतेही शिवीगाळ वैगरे झालेली नाही. उलट पोलिसांनीच आमच्या एका पदाधिकारी याला पकडून, 'तू झोमाटोमध्ये कशाला काम करतो. रात्री पार्सल देण्यासाठी का जातो असे म्हणत दिवसभर पोलीस ठाण्यात बसून ठेवले होते. त्यामुळे कोणावरही खोटा गुन्हा दाखल करू नका म्हणून मी पोलिसांना बोललो." असल्याचे सावे म्हणाले आहेत. 

पोलीस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश.

एक महिला पोलीस अधिकाऱ्याला थेट भाजपच्या कार्यकर्त्याने बदलीची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, पोलीस दलात देखील याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी देखील दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. तसेच,  डीसीपी दर्जाच्या महिला अधिकारी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे पोलीस आयुक्त लोहिया यांनी सांगितले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

ऐन ध्वजारोहणाच्या वेळी वीज खंडीत, मंत्री सावे संतापले, अधिकाऱ्यांची पळापळ; तब्बल अर्ध्या तासांनी वीज सुरळीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Embed widget